Adhik Shravan Somvar: श्रावणातील पहिल्या सोमवारचे जाणून घ्या महत्व

सोमवार हा दिवस शंकराला समर्पित असतो. भोलेनाथाला श्रावण का प्रिय आहे हे जाणून घेऊया.
Adhik Shravan Somvar
Adhik Shravan SomvarDainik Gomantak
Published on
Updated on

Adhik Shravan Somvar: यंदा श्रावण महिना हा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर अधिक श्रावण महिना हा 18 जुलै पासून सुरू झाला आहे. आज अधिक महिन्यातील पहिला सोमवार आहे. तसेच महादेवाचाहा सर्वात आवडता महिना मानला जातो. श्रावणात मनोभावे भोलनाथाची पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात.

श्रावण महिन्यातील या पहिल्या सोमवारी मनोभावे पुजा केल्याने अनेक फायदे होतात. श्रावणात सोमवारच्या दिवशी भोलेनाथाच्या उपासनेसाठी भाविक मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात. पण सोमवारचे महत्व नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • श्रावणी सोमवारचं महत्व काय

भाविक अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे सोमवारी महादेवाची पूजा अर्चा करताना पाहायला मिळतात. याचे कारण म्हणजे दिवसाच्या नावातच दडलेले आहे. सोमवार हे नाव कसं पडलं असा प्रश्न ज्याच्या मनात आला आहे त्यांनी हे उत्तर शोधलंच पाहिजे.

Adhik Shravan Somvar
Feng Shui Tips: फेंगशुईनुसार 'या' वस्तु घरात ठेवल्यास दूर होतील आर्थिक समस्या
  • सोमवार हे नाव कसे पडले?

सोमवार हे नाव महादेवाच्या सोमनाथ या नावावरून घेतले आहे. सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस म्हणून ओळखला जातो. सोमनाथ या भगवान शिवाच्या नावावरून सोमवार हे नाव घेतले असून श्रावणातल्या सोमवारी अनेक भक्त महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जातात.

  • श्रावण महिना हा महादेवाला प्रिय का आहे?

श्रावण महिन्यात माता सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी माता सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता.

देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला.

त्यामुळेच श्रावण महिना भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आहे. कुमारिका म्हणजेच मली देखील श्रावण महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वती यांची मनोभावे पूजा करून आपल्यालाही महादेवांसारखा नवरा मिळावा अशी मनोकामना करतात.

श्रावणात महादेवाला अर्पण करावी ‘ही’ फुलं

  • चमेली फुल

महादेवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते. महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते.

  • पारिजात

पारिजात हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख-संपत्ती व समृद्धीचा वास असतो.

  • धोतऱ्याचे फुल

शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

मोगरा फुल

श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. तसेच भगवंताला बेला पत्र अर्पण करा.

श्रावणात या पदार्थांचे सेवन टाळावेत

मद्यपान

श्रावणात मद्याचे सेवन करू नये. असे करणे पाप मानले जाते. मद्यपान करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

कांदा आणि लसूण
रात्रीचे जेवण सात्विक करायचे असल्यास इतर भाज्यांबरोबरच कांदा आणि लसूणही टाळावे. या दोन्ही भाज्या उष्ण किंवा तामसिक मानल्या जात असल्याने त्याचे सेवन करू नये.

मांसाहार

मांसाहारी खाद्यपदार्थ श्रावण महिन्यात मांस, चिकन, अंडी आणि मासे (Fish) यांसह मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जात नाही. या महिन्यात हत्या करणे पाप मानले जाते.

वांगे

वांग्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये शुद्ध वस्तू मानण्यात आलेले नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक प्रसंगी तो अशुभ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात वांगी खाणे टाळावे.

मसाले

श्रावणात तिखट, धने पावडर, आणि इतर सर्व मसाले याशिवाय सेंद नमक खाणे टाळावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com