Healthy Teeth Tips: फक्त 120 सेकंद आणि तुमच्या दातांना मिळेल सुरक्षा; तज्ज्ञांचा 'टू-मिनिट रूल' नक्की आहे तरी काय?

Dental Hygiene Routine: दिवसातून दोन वेळा दोन मिनिटं दात घासण्याचा सल्ला अनेकजणं देताना तुम्ही ऐकलं असेल. पण खरंच, हे दोन मिनिटं दात घासणं एवढं महत्वाचं का?
 tooth care in 2 minutes
tooth care in 2 minutesDainik Gomantak
Published on
Updated on

Oral Care Tips: दिवसातून दोन वेळा दोन मिनिटं दात घासण्याचा सल्ला अनेकजणं देताना तुम्ही ऐकलं असेल. पण खरंच, हे दोन मिनिटं दात घासणं एवढं महत्वाचं का? हे जाणून घेऊया. या प्रश्नाचे उत्तर देताना के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील दंत सल्लागार डॉ. बिपिन उपाध्याय (एमडीएस) यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबद्दलच महत्वाची माहिती दिलीये.

डॉ. उपाध्याय सांगतात, “चांगले मौखिक आरोग्य केवळ आकर्षक हसण्यासाठी नव्हे, तर ते हसणं टिकवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने काळजी घेता, त्यावरही अवलंबून असतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.” तुम्हाला जर का दात स्वच्छ आणि निरोगी ठेवायचे असतील तर दोन मिनिटं अत्यंत महत्वाची आहेत, कारण या वेळेत तुमच्या दातांच्या प्रत्येक भागातून अन्नाचे कण, जीवाणू आणि प्लाक पूर्णपणे काढून टाकण्यास मदत मिळते.

मऊ ब्रिस्टलस असलेला ब्रश वापरणं

तज्ज्ञांच्या मते, दात घासण्यासाठी मऊ ब्रिस्टलस असलेला ब्रश वापरणं देखील तितकेच महत्वाचं आहे. ब्रश करताना ब्रिस्टलसची दिशा आणि कोन कसा असावा, याबद्दल मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हिरड्यांना ४५ अंशांच्या कोनात ब्रश पकडून दातांचे पुढील, मागील आणि चावण्याचे सर्व भाग हळू गोलाकार पद्धतीने घासले पाहिजेत, मात्र यात जोर लावून दात घासणं टाळावं.”

 tooth care in 2 minutes
World Oral Health Day 2023: मौखिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

दोन मिनिटं, दिवसातून दोन वेळा दात घासल्याने दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते, असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

योग्य टूथपेस्टची निवड महत्त्वाची

डॉ. उपाध्याय पुढे सांगतात, “दोन मिनिटे दात घासण्यासोबतच योग्य टूथपेस्ट निवडणंही महत्त्वाचं आहे.” त्यांनी फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट निवडण्याचा सल्ला दिला आहे, कारण फ्लोराईड दातांच्या आवरणाला मजबूत करतं आणि किडण्यापासून बचाव करतं. कधीकधी ब्रशमुळे प्लाक पूर्णपणे निघत नाही. जर फ्लॉसिंग कठीण वाटत असेल, तर वॉटर फ्लॉसर किंवा इंटरडेंटल ब्रश वापरून पाहा,” असेही ते म्हणाले.

नियमित दंत तपासणी आवश्यक

डॉ. बिपिन उपाध्याय यांनी मौखिक कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी नियमित दंत तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. “योग्य टूथपेस्ट वापरून दिवसातून दोन वेळा दोन मिनिटे दात घासण्याची सवय लावल्यास, तुम्ही तुमच्या मौखिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकता आणि एक निरोगी, तेजस्वी हास्य कायम ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com