Virat Kohli: कोहलीची 'विराट' कामगिरी ! मास्टर ब्लास्टरचा मोडला रेकॉर्ड; इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Virat Kohli: कोहलीची 'विराट' कामगिरी ! मास्टर ब्लास्टरचा मोडला रेकॉर्ड; इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
Virat KohliDainik Gomantak
Published on
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

भारत आणि इंग्लंड एकदिवसीय सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

विराटची बॅट तळपली

अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले.

Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

विराटने मोडले रेकॉर्ड

या खेळीद्वारे विराटने दोन मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले. तो आशियातील सर्वात कमी डावांमध्ये 16 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा फलंदाज बनला. इंग्लंडविरुद्ध चार हजार धावा करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटूही ठरला.

Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

सर्वात कमी डावांमध्ये 16,000 धावा पूर्ण

इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावून 16,000 धावा पूर्ण करुन विराटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. कोहलीने त्याच्या 340 व्या डावात ही कामगिरी केली. तर सचिनने आशियात 353 डावांमध्ये 16 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 360 डावांमध्ये हा विक्रम केला होता तर महेला जयवर्धनेने 401 डावांमध्ये हा विक्रम केला होता.

Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

पहिला भारतीय फलंदाज ठरला

विराटने अहमदाबादमध्ये आणखी एक खास विक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या 87 व्या सामन्यात ही कामगिरी केली. आतापर्यंत विराटने इंग्लंडविरुद्ध 41.23 च्या सरासरीने 8 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. एकूणच तो इंग्लंडविरुद्ध 4 हजारांहून अधिक धावा करणारा सहावा क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ज्याने 37 कसोटी सामन्यांमध्ये 5028 धावा केल्या होत्या.

Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

451 दिवसांनंतर अर्धशतक झळकावले

रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने पहिल्या 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये 451 दिवसांनंतर विराटचे अर्धशतक आले. त्याने 55 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावा केल्या. इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज आदिल रशीदने पुन्हा एकदा कोहलीला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com