संपुर्ण भारत देश आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती साजरी करत आहे. 21 ऑक्टोबर 1943 हा दिवस भारतासाठी खूप खास आहे. या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली होती. त्याचवेळी नव्याने आझाद हिंद फौज स्थापन करून त्यात आपले आयुष्य समर्पण केले होते.
त्या दिवशी इंडियन इंडिपेंडन्स लीगचे प्रतिनिधी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा ऐकण्यासाठी सिंगापूरमधील कॅथे सिनेमा हॉलमध्ये जमले होते. ते एवढे भरले होते की, तिथे उभे राहण्यासाठी एक इंचही जागा नव्हती.
सायंकाळचे 04 वाजताच नेताजी मंचावर उभे राहिले. त्यांनी एक विशेष घोषणा करायची होती. ही घोषणा 1500 शब्दांत होती, जी दोन दिवसांपूर्वी रात्री बसून नेताजींनी स्वत: तयार केली होती.Netaji Subhash Chandra Bose
“ब्रिटिश आणि त्यांच्या मित्रांना भारतातून हाकलून देणे हे हंगामी सरकारचे काम असेल. भारतीयांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या श्रद्धेनुसार आझाद हिंदचे कायमस्वरूपी सरकार स्थापन करणे हे देखील हंगामी सरकारचे काम असेल," असे त्या घोषणेत म्हटले होते.
नेताजींनी हंगामी सरकारमध्ये तीन पदे भूषवली
सुभाषचंद्र बोस पंतप्रधान तर झालेच त्यासोबतच ते युद्ध आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रीही झाले. याशिवाय या सरकारमध्ये आणखी तीन मंत्री होते. तसेच 16 सदस्यीय मंत्रीस्तरीय समितीही होती. हंगामी सरकारची घोषणा केल्यानंतर, भारताप्रती निष्ठेची शपथ घेण्यात आली.
नेताजी जेव्हा राष्ट्रनिष्ठेची शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा कॅथे हॉलमध्ये सगळेच भावूक झाले होते. वातावरण स्तब्ध झाले होते तेव्हा नेताजींचा आवाज घुमला, "देवाचे नाव घेवून मी ही पवित्र शपथ घेतो की, मी भारत आणि तेथील 38 कोटी रहिवाशांना गुलामगिरीतून मुक्त करीन."
नेताजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले,
नेताजींना भरून आले आणि त्यांचा आवाज बंद झाला. त्याच्या डोळ्यांतून गालावर अश्रू वाहू लागले. त्यांनी रुमाल काढून अश्रू पुसले. त्यावेळी मात्र सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
आझाद हिंद सरकारमधील नेत्यांची नावं
सुभाषचंद्र बोस – राज्याचे प्रमुख, पंतप्रधान, युद्ध आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री
कॅप्टन श्रीमती लक्ष्मी – महिला संघटना
एसए अय्यर – प्रचार आणि प्रसारणमंत्री
ले. कर्नल एसी चटर्जी – अर्थमंत्री
ले. कर्नल अजीज अहमद, लेफ्टनंट, कर्नल एन एस भगत, ले. कर्नल जे.के.भोंसले, ले. कर्नल गुलजार सिंग, ले. कर्नल एम. झेड. कियानी, ले. कर्नल एडी लोगानादन, लेफ्टनंट. कर्नल एहसान कादिर, ले. कर्नल शाहनवाज (सशस्त्र दलांचे प्रतिनिधी), एएम सहाय्यक सचिव, रासबिहारी बोस (सर्वोच्च सल्लागार), करीम घनी, देवनाथ दास, डीएम खान, ए, यलप्पा, जे थिवी, सरकार ईशर सिंग (सल्लागार), एएन सरकार (कायदेशीर सल्लागार)
7 देशांनी तत्काळ मान्यता दिली होती
नेताजींच्या या सरकारला जर्मनी, जपान, फिलीपिन्स, कोरिया, इटली, मंचुकुओ आणि आयर्लंड यांनी लगेच मान्यता दिली होती. जपानने या हंगामी सरकारला अंदमान आणि निकोबार बेटे दिले होते. नेताजींना त्या बेटाला अंदमानचे नवीन नाव शहीद द्विप आणि निकोबारचे नाव बदलून स्वराज्य द्विप असे ठेवले. 30 डिसेंबर 1943 रोजी या बेटांवर स्वतंत्र भारताचा ध्वजही फडकवण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.