बदाम आणि काजूमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. 28 ग्रॅम बदामांमध्ये सुमारे 76 मिग्रॅ मॅग्नेशियम असते. हे स्नायू आणि हृदयासाठी लाभदायक असतात.
पालक
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. एक कप शिजवलेल्या पालकात 157 मिग्रॅ मॅग्नेशियम असते. हे हाडे आणि रक्तदाबासाठी उपयुक्त आहे.
केळी
केळी ही केवळ ऊर्जा देणारे फळ नसून, मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. एका मोठ्या केळीत 37 मिग्रॅ मॅग्नेशियम असते.
बियाणे
जवस, चिया, सूर्यफूल बियाणे ही बियाणे कोरडी किंवा भिजवून खाल्ली तरी फायदेशीर असतात. तुम्ही ती पोषणयुक्त स्मूदी, पराठे, सूप किंवा कोशिंबिरीत टाकून सेवन करू शकता. एक चमचा फ्लॅक्ससीडमध्ये 40 मिग्रॅ मॅग्नेशियम असते.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच मॅग्नेशियम असते. 28 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये 64 मिग्रॅ मॅग्नेशियम असते, जे हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे.
सोयाबीन आणि डाळी
सोयाबीन, मसूर आणि हरभऱ्यासारख्या कडधान्यांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते. एक कप शिजवलेल्या सोयाबीनमध्ये 148 मिग्रॅ मॅग्नेशियम असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.