नागपंचमी हा सण आज भारतभर साजरा केला जातो. आजचे औचित्य साधून गोव्याच्या जंगलात आढळणाऱ्या सापांच्या निवडक प्रजातींची माहिती घेऊ.
नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतात दुर्मिळ होत चालला आहे. याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर आडवे पट्टे असतात.
भारतात सर्वाधिक मृत्यू या सापाच्या दंशामुळे हाेतात. या सापाला बिनविषारी अजगर समजण्याची चूक होते. त्याच्या अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात.
हा भारतात आढळणाऱ्या चार मोठ्या विषारी सापांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचे खवले एकमेकांवर घासल्यामुळे करवतीसारखा आवाज तयार होतो. याचे डोके त्रिकोणी असते.
या सापाचे विष नागापेक्षा अधिक शक्तिशाली असते. साधा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.
हा बिनविषारी साप शक्यतो पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात आढळतो.
घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवर यांचा वावर असतो. अजगराच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात.
हरणटोळ साप जंगलांमध्ये सापडतो. हा पूर्णपणे झाडावरच राहतो आणि जगतो तसेच नेहमी वेलींवर,फांद्यांवर दिसून येतो. जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो.
लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.