आपल्या आवाजाने कोकणी जनतेच्या हृदयांना आनंद देणाऱ्या लोर्ना कार्दैरो हिने आपल्या वयाची ८0 वर्षे पूर्ण केली.
अवघ्या १५ व्या वर्षी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक क्रिस पेरी याच्या बँडमध्ये गायला सुरुवात करणाऱ्या लोर्नाने आपल्या गायन कारकिर्दीत अनेक खाचखळगे पाहिले
२६ व्या वर्षापर्यंत म्हणजे ११ वर्षे ती क्रिस पेरीसाठी गायली. क्रिस यांच्या संगीताची जादू आणि लोर्नाचा आवाज यातून निर्माण झालेल्या ६०च्या दशकातील गाणी अद्भुत होती.
तुजो मोग, पिसो, बेबदो, लिस्बोआ, नाचोंया कुंपासार, तुजो मोग, आदेवस, आपघात या त्यांच्या गाण्यांनी कोकणी संगीताचे दालन रत्नखचित केले.
क्रिस पेरीबरोबर मतभेद झाल्यानंतर लोर्नाने गाणेच गायचे सोडले. त्यानंतर पुढील 23 वर्षे ती गाण्याशिवाय राहिली.
त्यानंतर एक डिसेंबर १९९५ रोजी मिरामारच्या किनाऱ्यावर लोर्नाने 23 वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमात पुन्हा गाणे म्हटले.
लॉर्नाने बॉलीवूड मधील दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी गाणी गायली आहेत. महंमद रफी, सुरेश भोसले या प्रसिद्ध गायकांबरोबरही ती गायली आहे.
पुनरागमनानंतर दुबई, कुवेत, कतार, बहरीन आदी मध्यपूर्वेतील देशांमध्ये तसेच लंडन आणि युरोपच्या काही भागांमध्येही तिच्या गाण्याचे कार्यक्रम झाले.
लोर्ना जेव्हा गाणे गात असते तेव्हा या वयातील आवाजही रसिकांसाठी जणू एक झंकार असतो. कवचासारख्या लाभलेल्या या सुरक्षिततेनेच तिला पुनर्जन्म आणि लोकांचे भरघोस प्रेमही दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.