तुम्ही कधी विचार केलाय का की पावसाचे थेंब गोलच का असतात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संविस्तरपणे
सर्वांनाच पावसाळा आवडतो असे नाही. पण अनेक लोक उन्हाळ्यात पावसळ्याची वाट पाहतात. पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच असतो. तसेच तळहातावर पावसाचे थेंब गोळा करण्याची, जमिनीवर पडणाऱ्या पाण्यात छया छपा छय करण्याचा आनंद वेगळा असतो. Dainik Gomantak
पावसाळ्यात पाण्याचे थेंब फुले, पाने, झाडे, घराची रेलिंग इत्यादीवर पडतात तेव्हा त्याचा आकार गोलाकार असतो. तुमच्या लक्षात अळे असले तरी पावसाचे थेंब गोलाकार
का पडतात याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर तुमच्या शालेय जीवनातील भौतिकशास्त्राच्या पुस्तकात मिळेल. लहानपणी वाचले असेल तर लक्षात
आलेच असेल! नसेल तर जाणून घेवूया Dainik Gomantak
शालेय दिवसांत भौतिकशास्त्राच्या पुस्तकात पृष्ठभागावरील ताणावर एक प्रकरण असायचे. पावसाच्या थेंब गोल असण्यामागचे कारण हा पृष्ठभागावरील ताण आहे. पृष्ठभाग तणावाच्या सिद्धांतामागे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण देखील भूमिका बाजवते . केवळ पाऊसच नाही तर एखाद्या द्रवाचे थेंबही उंचावरून पृथ्वीवर पडले तर ते थेंब बदलतात.
Dainik Gomantak
आता प्रश्न असा आहे की पृष्ठभागावरील ताण म्हणजे काय. हा द्रवाच्या पृष्ठभागाचा गुणधर्म आहे, ज्यामुळे तो लवचिकते सारखा विस्तारतो किंवा आकुंचन पावतो. द्रवाचा हा गुणधर्म थेंब किंवा साबणाच्या बुडबुड्याजवळ देखील दिसू शकतो. तुम्ही लहान मुलांना फुगे उडवताना पाहिल असेल. पृष्ठभागाच्या तणावामुळे ते गोलाकार आहेत.
Dainik Gomantak
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्वात लहान आकार गोल होतो. यामुळे पावसाचे पाणी जसजसे पृथ्वीच्या जवळ येते तसतसे ते गोलाकार बनते. त्याचे क्षेत्रफळ कमी होते.
या कारणांमुळे, पावसाचे थेंब नेहमी गोलाकार असतात.
Dainik Gomantak