
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रकारची वाहने आहेत, ज्यामध्ये कार, बस, ट्रेन आणि विमान यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पण अनेकदा लोकं ट्रेनने (Train) प्रवास करणे जास्त पसंत करतात. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक सुविधा आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो. त्याच वेळी, जर आपण रेल्वे तिकिटांबद्दल बोललो, तर पूर्वी लोकांना रेल्वे तिकिटांसाठी रेल्वे काउंटरवर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत होते, परंतु आता लोक घरी बसून ऑनलाइन माध्यमातून तिकीट बुक करतात. तुम्ही इंडियन रेल्वे (Indian Railway) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमचे ट्रेन तिकीट बुक करू शकता. परंतु अनेक वेळा लोक पासवर्ड विसरतात, त्यामुळे त्यांना तिकीट बुक करणे अवघड होवून बसते. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर आम्ही तुम्हाला IRCTC पासवर्ड रिकव्हर कसा करायचा याबद्दल माहिता देतोय...
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
तुमचा पासवर्ड कसा रिसेट करणार
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
स्टेप 1
तुम्हाला तुमचा IRCTC पासवर्ड रिकव्हर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train-search वर जावे लागेल.
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
स्टेप 2
यानंतर तुम्हाला या पेजच्या वरच्या भागात लॉगिन पर्याय दिसेल आणि तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला Forget Password असा पर्याय दिसेल.
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
स्टेप 3
तुम्हाला पासवर्ड फॉरगेट या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला IRCTC आयडी, जन्मतारीख आणि कॅप्चर कोड यासारखी आवश्यक माहिती सबमिट करावी लागेल.
IRCTC Password Reset Process
Dainik Gomantak
स्टेप 4
यानंतर पासवर्ड रिकव्हर करण्यासाठीचा तपशील तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल. याचा वापर करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिकव्हर करू शकता आणि तुम्ही IRCTC द्वारे तुमच्या ट्रेनची तिकिटं बुक करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.