80 वर्ष जुन्या आंब्याच्या झाडावर उभारलं 4 मजली घर, पाहा फोटो

घराची उंची सुमारे 40 फूट
house built on 80 year old mango tree see stunning pictures
house built on 80 year old mango tree see stunning picturesDainik Gomantak
Published on
Updated on

आपण पाहतो प्रत्येकाचे स्वप्न असते ते म्हणजे घर बांधणे. असंच एक आयआयटी इंजिनिअरचे स्वप्न होते ते घर बांधण्याचे,पण त्याचे स्वप्न जमिनीवर नाही तर झाडावर घर बांधण्याचे आहे. विशेष म्हणजे त्याने ते पूर्ण केले. खरेतर हे अनोखे घर उदयपूर या शहरामध्ये बांधले आहे. कुल प्रदीप सिंह नावाच्या आयआयटी अभियंत्याने 2000 साली हे अनोखे घर बांधले. सिंग यांनी त्यांच्या स्वप्नातील हे घर जमिनीपासून 9 फूट उंच बांधले आहे. या घराची उंची सुमारे 40 फूट आहे.(house built on 80 year old mango tree see stunning pictures)

house built on 80 year old mango tree see stunning pictures
house built on 80 year old mango tree see stunning picturesDainik Gomantak

80 वर्ष जुने आंब्याचे झाडावर त्याने हे चार मजली घर बांधले होते. 'ट्री हाऊस' म्हणून ओळखले जाणारे हे घर 'फुल फर्निश्ड' आहे. तसेच आश्चर्य वाटेल की या घरात आजकालच्या सर्व सुविधा आहेत. पर्यावरणप्रेमी अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी हे घर बांधण्यासाठी झाडाची एक फांदीही तोडली नाही. या घरात एक खास प्रकारच्या पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. 4 मजली घर बांधण्यासाठी सिमेंटचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. हे घर स्टील, सेल्युलर आणि फायबर शीट वापरून बांधण्यात आले आहे.

house built on 80 year old mango tree see stunning pictures
house built on 80 year old mango tree see stunning picturesDainik Gomantak

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जोराचा वारा सुटला की घर डोलायला लागतं. केपी सिंग यांनी सोफा स्टँड आणि टीव्ही स्टँड म्हणून झाडाची फांदी वापरली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरात स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, डायनिंग हॉल आणि लायब्ररीसह सर्व सुविधा आहेत.तसेच किचन, बेडरूम, लायब्ररी आदींमधून झाडांच्या फांद्या बाहेर आल्या आहेत. आंब्याच्या मोसमात जेव्हा झाडाला फळे येतात, तेव्हा आंबे घरामध्येही लटकलेले दिसून येतात. घरात अनेक खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षी घरात येत राहतात.

house built on 80 year old mango tree see stunning pictures
house built on 80 year old mango tree see stunning picturesDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com