तवशाचे फेस्त
गोव्यात अनेक महोत्त्सव साजरे केले जातात त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे तवशाचे फेस्त महोत्सव आहे.
स्थळ
हा उत्सव गोवा येथील सांताना-तळावली येथील सेंट अॅन चर्चमध्ये संपन्न झाला.
हा विश्वास इतका दृढ आहे की अनेक पंथांचे आणि धर्मांचे लोक आपली ही इच्छा घेऊन फेस्तात रांगेत उभे राहिलेले असतात.
फेस्ताची सुरुवातीची सामुदायिक प्रार्थना संपली की धर्मगुरू हातात प्रतिमा घेऊन चर्चभोवती परिक्रमा करतात. या फेस्तात पोलिसांच्या बॅंडने या कर्णमधूर संगीत सादर केले.
सेंट अॅनला काकड्या (कोकणीत तवशी) अर्पण करून अनेक निपुत्रिक जोडपी अपत्य प्राप्तीची प्रार्थना या महोत्सवात करतात.
या दरम्यान वाजणाऱ्या चर्चच्या घंटा अतिशय सुंदर वातावरणाची निर्मिती करत होत्या. पाऊस हलक्याने बरसत असला तरी त्या वातावरणात लोक आनंदाने वावरत होते.
ख्रिस्ताचे आजोबा सेंट जोकीम आणि आजी सेंट अॅन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे फेस्त दरवर्षी साजरे होते. या मागची कथा ही आहे की हे जोडपे जवळजवळ वीस वर्षे निपुत्रिक होते. सुखी वैवाहिक जीवन असूनही त्यांना मूल नव्हते म्हणून त्यांना लोकांच्या थट्टेचा सामना करावा लागत असे.
तवशी फेस्ट हा या प्रदेशातील सांस्कृतिक विविधता आणि एकता दर्शवतो, सर्व धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात.
परमेश्वराची खूप प्रार्थना केल्यानंतर जोकीमला स्वप्न पडले की त्याला एक अपत्य होईल जे देवाच्या खूप जवळ असेल. हे स्वप्न खरे होऊन वयाच्या ४0 व्या वर्षी अॅनने मेरीला जन्म दिला, जी पुढे येशूची आई बनली. काळ लोटल्यानंतर सेंट अॅन निपुत्रिकांसाठी आशेचे स्थान बनली. ‘सेन्होरा, तोमाय पेपिनो, दाय मी मेनीनो’ या शब्दांतून या चर्चमध्ये प्रार्थना आळवली जाते.
सेंट अॅन चर्चची वारसा इमारत सुंदर आहे. फेस्ताच्या दिवशी तिथे अनेक लोक सहभागी होत असतात.
ही काकडी घे आणि मला अपत्य दे.’ देवीला काकडी अर्पण करताना सोबत तिच्या पायाशी फुले देखील वाहिली जातात.
ख्रिस्ताचे आजोबा सेंट जोकीम आणि आजी सेंट अॅन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे फेस्त दरवर्षी साजरे होते.
सेंट अॅन चर्चची वारसा इमारत सुंदर आहे. फेस्ताच्या दिवशी तिथे लांबलचक सर्वधर्मीय रांग लागलेली असते. कुटुंबे आपल्याला लहान मुलांसह काकड्या हातात घेऊन संयमीपणे आपल्या पाळीची वाट पाहत उभी असतात.
हातात काकड्या आणि फुले घेऊन प्रवेशद्वारापाशी विक्रेते उभे असतात. विक्रीसाठी आणलेल्या काकड्यांचे हे गावातील पहिले पीक असते. एका अर्थाने हे फेस्त पहिले पीक देवाच्या चरणी वाहण्याचे एक निमित्तही असते.
देवीच्या पायापाशी दोन काकड्या ठेवल्या जातात त्यापैकी एक तिथेच राहते तर दुसरे भक्त प्रसाद म्हणून घेऊन जातो. केवळ अपत्य प्राप्तीसाठीच नव्हे तर चांगला जोडीदार लाभावा म्हणून कुमारीकाही या फेस्तात देवीला नवस करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.