Goa, Ramnath Temple: सर्वांग सुंदर अशा गोव्यातील प्राचीन 'रामनाथ मंदिर'

Goa, Ramnath Temple: सर्वांग सुंदर अशा गोव्यातील प्राचीन 'रामनाथ मंदिर'
Goa, Ramnath TempleDainik Gomantak
Published on
Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

सर्वांग सुंदर असा गोवा: निसर्गाचं वरदान लाभलेला सर्वांग सुंदर असा गोवा मोहिनी घालतो. येथील प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

गोव्यातील मंदिरे: गोव्यात अनेक प्रसिद्ध प्राचीन मंदिरे आहेत. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून रामनाथ मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.

Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

रामनाथ मंदिर: बांदोडा येथील रामनाथी येथे स्थित असलेले रामनाथ मंदिर इतिहासाच्या कोंदणात वसलेले आहे. मूळतः हे मंदिर सासष्टी तालुक्यात जुवारी नदीच्या काठावर वसलेल्या लोटली या सुंदर गावात स्थित होते.

Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

पोर्तुगिजांची दहशत: 1568 साली पोर्तुगीज ‘इन्क्विझिशन’आणि त्याअंतर्गत पोर्तुगीजांनी माजविलेल्या दहशतीमुळे श्री रामनाथाच्या भक्तांना ही मूर्ती बांदिवडे किंवा बांदोडा या गावात स्थलांतरित करावी लागली.

Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

नष्ट: रायतूर (राचोल) येथील किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार दिओगो रॉड्रिग्सने लोटली येथील भगवान रामनाथाचे मंदिर नष्ट केले आणि जाळून टाकले.

Goa, Ramnath Temple
Goa, Ramnath TempleDainik Gomantak

मंदिर उभारले: भाविकांनी आपले कुलदैवत श्री रामनाथासाठी बांदोडा येथे छोटेसे मंदिर उभारले. मंदिराच्या मध्यभागी श्री रामनाथाची स्थापना करून, एका बाजूला कामाक्षी तर दुसऱ्या बाजूला सातेरी, अशा दोन देवींच्या मूर्ती स्थापन केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com