Goa Monsoon Visit Places: गडकिल्ल्यांचा 'साज'! गोव्याला जाताय मग 'हे' 5 किल्ले नक्की पाहा

Goa Monsoon Visit Places: गडकिल्ल्यांचा 'साज'! गोव्याला जाताय मग 'हे' 5 किल्ले नक्की पाहा
Goa FortDainik Gomantak
Published on
Aguada Fort
Aguada Fort

गोवा पर्यटन: गोव्याला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. गोव्यात गडकिल्ल्यांची उत्तमरित्या जोपासना करण्यात आलीय. पर्यटक खासकरुन पावसाळ्यात किल्ले पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.

Aguada Fort
Aguada Fort

गोव्यातील गडकिल्ले: आज आपण फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील गडकिल्ल्यांविषयी जाणून घेणार आहोत. गोव्यातील किल्ल्यांनाही तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे.

Aguada Fort
Aguada Fort

गोव्यात 42 किल्ले: डोंगरकपारीने वेढलेल्या या राज्यांत तब्बल 42 किल्ल्यांची नोंद झालेली आहे. चला तर मग 5 महत्त्वाच्या किल्ल्यांविषयी जाणून घेऊया...

Aguada Fort
Aguada Fort

अग्वाद किल्ला (Aguada Fort): उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यात हा किल्ला स्थित आहे. गोव्यातील पोर्तुगीज कारभाराचं सत्ताकेंद्र राहिलेला एक भव्य आणि प्रसिद्ध असलेला अग्वाद किल्ला आहे.

Chapora Fort
Chapora Fort

शापोरा किल्ला (Chapora Fort): उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातच हाही किल्ला आहे. गोव्यातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक शापोरा किल्ला आहे.

Corjuem Fort
Corjuem Fort

खोर्जुवे किल्ला (Corjuem Fort): उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील हळदोने गावाजवळ, म्हापसा नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्या बेटावर हा किल्ला इ.स. 1550 मध्ये बांधण्यात आला होता.

Mormugao Fort
Mormugao Fort

मुरगाव किल्ला (Mormugao Fort): गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यात वास्को पासून 4 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. मुरगाव बंदर हे खोल समुद्राचे नैसर्गिक बंदर आहे. व्यापारी जहाजे हा पोर्तुगीजांच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत होता.

Rachol Fort
Rachol Fort

राशोल किल्ला (Rachol Fort): दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात मडगावच्या ईशान्येस साधारण 5 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. आता या किल्ल्याचे काही थोडेफार अवशेष शिल्लक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com