Goa Assembly Session 2025 : कसा होता गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस? पाहा फोटो

Assembly Session 2025: गोवा विधानसभेचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन गुरुवारी (०६ फेब्रुवारी २०२५) सुरुवात झाली आहे.
Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak
Published on
Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन

गोवा विधानसभेचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन गुरुवारी (०६ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सभागृहाबाहेर मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

सभागृहात प्रवेश

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी एकत्र सभागृहात प्रवेश केला.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

अभिभाषणानं सुरुवात

सकाळी ११: ३० वाजता अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणानं झाली.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

निषेध बॅनर

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच विरोधकांकडू सभागृहात गोंधळ घालण्यात आला. विरोधी बाकावरील आमदारांकडून अधिवेशनाच्या कमी कालावधीविरोधात सभागृहात निषेध बॅनर झळकावण्यात आले.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

सभागृहातून बाहेर काढण्याचा इशारा

सभापती रमेश तवडकरांनी विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाचे कामकाज एकच दिवस चालणार असल्यामुळे विरोधक राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी आक्रमक झाले.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

आवाज काडटा ताका ठोक

राज्यपालांच्या पूर्ण अभिभाषणावेळी विजय सरदेसाई यांनी "नोकरे खातीर दी रोख, भाजपा सरकाराची एकूच मोख ओगी रावल्यार सुटलो, आवाज काडटा ताका ठोक", अशा आशयाचा फलक हातात घेऊन उभे राहत निषेध केला.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

लोकशाहीची हत्या

एक दिवसाच्या अधिवेशनावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर टीका केली. युरी आलेमाव यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला. हे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप आलेवाम यांनी केला.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

कॅश फॉर जॉब स्कॅमवरुन सरकारला घेरलं

विजय सरदेसाई यांनी कॅश फॉर जॉब स्कॅमवरुन सरकारवर निशाणा साधला. पैसे घेऊन नोकरी देण्याची भाजप सरकारनं नवी पद्धत सुरु केलीय. शांत बसेल त्याची सुटका केली जाते, पण आवाज केल्यास कारवाई होते, अशा आशयाचा बॅनर सरदेसाईंनी हातात धरुन निषेध नोंदवला.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak

वेंझी व्हिएगस यांचा सरकारवर निशाणा

आमदार वेंझी व्हिएगस यांनी देखील आवज उठवत कमी कालावधीवरुन हातात फलक घेऊन निषेध नोंदवला. वेंझी व्हिएगस यांनी देखील एक दिवसाच्या अधिवेशन कालावधीवरुन सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com