Home Remedies: मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

अनेकांची मान काळी असते.
Follow these home remedies to get rid of dark neck
Follow these home remedies to get rid of dark neckDainik Gomantak
Published on
Dark Neck
Dark NeckDainik Gomantak

प्रत्येक व्यक्ती आपली त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतो, परंतु सर्व उपाय बहुतेक फक्त चेहऱ्यासाठीच केले जातात. तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर अनेकांची मान काळी दिसते.

Health Tips | Neck
Health Tips | Neck Dainik Gomantak

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता.

lemon juice
lemon juiceDainik Gomantak

एक मोठा चमचा बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही घालून चांगले मिसळा. ही तयार केलेली घट्ट पेस्ट मानेवर लावा आणि २० मिनिटे राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

baking soda
baking sodaDainik Gomantak

सामान्य पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण मानेवर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.

Milk Supply
Milk SupplyDainik Gomantak

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी अर्धा कप कच्चे दूध घ्या. आता हे दूध कापसाच्या मदतीने मानेवर लावा. अर्ध्या तासानंतर सामान्य पाण्याने धुवा. हा उपाय नियमित 1 महिना केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.

Aloe Vera
Aloe VeraDainik Gomantak

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी कोरफड हा देखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. यासाठी कोरफडीचे पान घेऊन त्याचा हिरवा थर काढा आणि जेलवर २ चिमूटभर हळद लावा आणि प्रभावित भागाला थोडा वेळ मसाज करा. ही प्रक्रिया आठवड्यातून 3 दिवस करता येते. लाभ मिळेल.

Tomato
Tomato Dainik Gomantak

टोमॅटोचे दोन भाग करा आणि त्याचा अर्धा भाग मानेवर चोळा. टोमॅटोचा रस 20 मिनिटे मानेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com