दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे बांधलेले हिंदू मंदिर सध्या जगभरात चर्चेतचा विषय ठरले आहे. हे भव्य हिंदू मंदिर 5 ऑक्टोबरपासून खुले होणार आहे. मंदिरात हिंदू धर्मातील 16 देवी-देवतांच्या मूर्ती स्थापनेसह इतर धार्मिक कार्यांसाठी नॉलेज हॉल आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था असणार आहे.
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, हे भव्य मंदिर या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर 5 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे लोकांसाठी खुले केले जाईल. हे हिंदू मंदिर जेबेल अली येथील एमिरेट्स कॉरिडॉर ऑफ टॉलरन्समध्ये आहे. हिंदू मंदिराव्यतिरिक्त येथे शीख गुरुद्वारा, हिंदू मंदिर आणि अनेक चर्च आहेत.
UAE सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर अधिकृत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. आणि धार्मिक विधीचेही आयोजन केले जातील. मंदिर दोन टप्प्यात लोकांसाठी खुले केले जाईल. पहिल्या टप्प्यात प्रार्थनास्थळ केवळ जनतेसाठी खुले होणार आहे.आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात मंदीराचा उर्वरीत भाग सुरू होणार आहे.
यामध्ये लोकांसाठी नॉलेज रूम आणि कम्युनिटी रूम सुरू होईल. मंदिराला पर्यटकांना भेट देता येणार. त्यासोबतच विवाह, हवन किंवा खाजगी कार्यक्रम आयोजित करू शकतात. मंदिरात 1000 ते 1200 लोक सहज पूजा करू शकतात. मात्र, हिंदू सणांच्या काळात ही संख्या जास्त असू शकते. आठवड्याच्या शेवटी अधिक लोकांनी अबू धाबीला भेट द्यावी अशी मंदीराच्या समितीची अपेक्षा आहे.
कोरोनाच्या काळात सर्व पाहुण्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी मंदिर प्रशासनाने QR कोड आधारित अपॉइंटमेंट सिस्टीम बसवली आहे. मंदिराशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मंदिरात येणारे भाविक सप्टेंबरपासून QR-कोड आधारित अपॉइंटमेंट बुक करू शकतात. तुम्हाला मंदिराच्या वेबसाइटवर QR कोड मिळू शकतो. मंदिरात प्रवेश करण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 असेल.
हे मंदिर 70,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरले आहे. भारतातील कारागीरांचा एक गट मंदिराच्या संगमरवरी डिझाइनला अंतिम रूप देण्यात गुंतला आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर एक प्रार्थना हॉल असेल, जिथे हिंदूंच्या 16 देवी-देवतांची पूजा केली जाईल. यासोबतच शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही असेल.
या भागात तळमजल्यावर 4,000 चौरस फुटांचा बँक्वेट हॉल, बहुउद्देशीय हॉल आणि नॉलेज हॉल यांचा समावेश आहे. कम्युनिटी हॉल आणि नॉलेज हॉलमध्येही अनेक एलसीडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत.
हिंदू मंदिराच्या अधिकृत उद्घाटनानंतर, दिवाळी आणि नवरात्रीसारख्या सणांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. या मंदिराच्या कामात विविध धर्माचे कारागीर कार्यरत आहेत. या मंदिराच्या समकालीन रचनेत पारंपरिक हिंदू मंदिराचे मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.
मंदिराचे मोठे लाकडी दरवाजे आणि काँक्रीटचे उंच खांब घंटा, हत्ती आणि फुलांनी सजवलेले आहेत. दक्षिण भारतातील देवतांच्या मूर्ती काळ्या दगडांवर कोरलेल्या आहेत. मंदिराच्या मध्यवर्ती व्यासपीठावर, शिवासह इतर 15 देवता असतील. दक्षिण भारतीय देवता, देवता गुरुवायूरप्पन आणि अय्यप्पन यांच्यासह गणेश, कृष्ण, महालक्ष्मी अशा इतर देवतांचीही प्रार्थना सभेत स्थापना केली जाणार आहे.
तुळशीच्या रोपासाठी एक खास परिसरही तयार करण्यात आला आहे. या परिसराचा उपयोग मुंडन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जाणार आहे. मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती बसवल्यानंतर 10 ते 12 पुजारी प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम घेतील. मंदिरात प्रत्येक वेळी किमान आठ पुजारी उपस्थित राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.