Christmas Celebration: डान्स, सेल्फी पॉईंट, देखावे; पाहा नाताळसणाचे खास फोटोज

Christmas
Christmas Dainik Gomantak
Published on

सेल्फी पॉईंट

कोंब-मडगाव येथे नाताळनिमित्त विद्युत रोषणाईचा ‘सेल्फी पॉईंट’ गोव्यात गाजतोय.

नृत्याचा आनंद

लोटली गावात इतर राज्यांतील खासकरून आसाम, झारखंड, ओडिशातील ख्रिस्ती बांधव राहतात. त्यांनी एकत्र येऊन नाताळाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.

कॅरोल

विद्यार्थ्यांनी कॅरोल गाणी व नाताळाची गाणी म्हटली. तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्मावरील प्रसंग सादर केला.

देखावा

अवरलेडी चर्चमध्ये तसेच बाहेर यंदा येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित आकर्षक गोठा सजावट देखावा साकारण्यात आला असून, हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

भाविकांची गर्दी

नाताळनिमित्त भाविकांनी थेट गोयच्या सायबाच्या दर्शनासाठी गर्दी करून दहा वर्षांत एकदा येणाऱ्या या शुभयोगाचा लाभ घेतला.

चांगला व्यवसाय

सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाला ख्रिसमसमुळे गर्दी वाढली. यावेळी पारंपरिक खाजे, चणे-शेंगदाणे विक्रेते व फेरीतील इतर दुकानदारांचा चांगला व्यवसाय झाला.

विद्युत रोषणाई

राज्यात सर्वत्र ख्रिसमस सणाची धूम असून विविध ठिकाणी केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देशी-विदेशी पर्यटकांना तर ही रोषणाई आकर्षित करत आहे.

नक्षत्र सजावट

अँथनी रॉड्रिगीस यांनी ९००हून अधिक नक्षत्रे लावून केलेली सजावट पाहण्‍यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com