There are tremendous benefits to applying tomatoes on the face
There are tremendous benefits to applying tomatoes on the faceDainik Gomantak

Benefits of Tomato: चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वाचून व्हाल हैराण

टोमॅटोचा (Tomato) वापर केल्याने त्वचेवरील (Skin) तेलकटपणा कमी होतो.
Published on

* मृत त्वचेपासून सुटका

प्रदूषणामुळे आपली त्वचा काळवंडते. केवळ चेहऱ्याची नियमित स्वच्छता करणे पुरेसे नसते. यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करणे देखील महत्वाचे आहे. टोमॅटोमध्ये (Tomato) इन्झाइम असतात जे एक्सफोलीएटर म्हणून काम करतात. यामुळे मृत त्वचेपासून (Dead skin) सुटका होण्यास मदत मिळते.

* त्वचेतील तेलकटपणा कमी होतो

टोमॅटोचा (Tomato) वापर केल्याने त्वचेला (Skin) अनेक फायदे होतात. जर तुमची त्वचा तेलकट (Oily) किंवा त्वचेवर पुरळ असतील तर टोमॅटोची पेस्ट करून चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे लावून ठेवावी. असे केल्याने त्वचेवरील (skin) तेलकटपणा आणि पुरळ कमी होतात.

* मुरूम कमी होतात

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी टोमॅटो (Tomato) लाभदायी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतात. तसेच यामध्ये अम्लिय गुणधर्म देखील असतात. यामुळे आपल्या त्वचेचे पीएचच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. टोमॅटोमुळे त्वेचेतील घाण निघून जाते. टोमॅटोच्या पेस्टमध्ये साखर मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने 2 ते 4 मिनिटे मसाज करावी. यामुळे त्वचेवरील मुरूम कमी होण्यास मदत मिळते.

* सनस्क्रीन म्हणून वापर

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी टोमॅटो मसाज क्रीममध्ये मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर चमक येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com