AUS vs IND 2nd Test: कांगारुंचं जशास तसं उत्तर! हिटमॅनची सेना ढेर; ऑस्ट्रेलिया पिंक बॉलचा 'बादशाह'

AUS vs IND 2nd Test: कांगारुंचं जशास तसं उत्तर! हिटमॅनची सेना ढेर; ऑस्ट्रेलिया पिंक बॉलचा 'बादशाह'
Aus Team Dainik Gomantak
Published on
Aus Team
Aus Team Dainik Gomantak

दुसरा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेतील दुसऱ्या पिंक बॉल टेस्ट मॅचमधील तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाचा धुव्वा उडवला.

Team India
Team IndiaDainik Gomantak

10 विकेट्सने पराभव: ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 10 विकेट्सने पराभव करुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Aus Team
Aus Team Dainik Gomantak

आव्हान: भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 19 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता 3.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

Aus Team
Aus Team Dainik Gomantak

त्रिकुट: मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड आणि पॅट कमिन्स हे त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील हा सलग चौथा पराभव ठरला.

Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

खराब कामगिरी: रोहितने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मुलाच्या जन्मानंतर परतलेला नियमित कर्णधार रोहित शर्माने बॅटिंगचा निर्णय घेतला.

Team India
Team IndiaDainik Gomantak

भारतीय संघ ढेर: मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर रोहितसेना 180 धावांवर ढेर झाली. टीम इंडियासाठी युवा नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. इतरांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही.

Aus Team
Aus Team Dainik Gomantak

गोलंदाजांची कामगिरी: मिचेल स्टार्क याने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com