
भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल यांनी वयाच्या 66 व्या वर्षी दुस-यांदा लग्न केले. एका खाजगी समारंभात त्यांनी बुलबुल साहाला आपला साथीदार बनवले. अरुण लाल यांनी त्यांची पहिली पत्नी रीना यांच्याकडून दुसऱ्या लग्नासाठी परवानगी घेतली होती.
भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल वयाच्या 66 व्या वर्षी दुस-यांदा नवरदेव बनले. एका आपल्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुलला त्यांना आपली पत्नि म्हणून स्विकार केले. या जोडप्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अरुण लाल हे त्यांची पहिली पत्नी रीनापासून वेगळे झाले होते, परंतु त्यांनी दुसऱ्या लग्नासाठी तिचीही मान्यता घेतली होती. खरे तर अरुण लाल यांची पहिली पत्नी रीना आजारी आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, माजी क्रिकेटर आणि त्याची दुसरी पत्नी बुलबुल लग्नानंतरही रीनाची काळजी घेतील.
माजी क्रिकेटर आणि बुलबुल यांचे लग्न कोलकात्यात झाले. गेल्या आठवड्यात दोघांच्या हळदी समारंभाचे फोटोही व्हायरल झाले होते. बुलबुलने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
अरुण लाल बंगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. बंगाल संघाने रणजी ट्रॉफी 2019-20 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु संघाला सौराष्ट्रविरुद्ध विजय नोंदवता आला नाही.
अरुण लाल यांची दुसरी पत्नी बुलबुल या व्यवसायाने शिक्षिका आहेत.
अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. त्यांनी भारतासाठी 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी 729 आणि 122 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.