
Laxmi Poojan horoscope: वैदिक पंचांगानुसार, आज २१ ऑक्टोबर २०२५, मंगळवार आहे आणि आज लक्ष्मीपूजनाचा दिवस सगळीकडेच आनंदाने साजरा केला जाईल. लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहावी, घरात भरभराट व्हावी म्हणून या दिवशी देवीची मनोभावे आराधना केली जाते. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज ग्रहांचा एक दुर्मिळ संयोग होत आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.
आज मेष राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. तुमच्या पैशाची आवक वाढेल, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही खरेदीचे बेत आखू शकता. घरातील व्यक्ती तुमच्यावर खुश राहतील. याउलट, वृषभ राशीच्या व्यक्ती आज प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टिक्षेपात येतील, ज्यामुळे कामाचा थोडासा ताण जाणवण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या महिला आज आपल्या व्यासंगात म्हणजेच अभ्यासात किंवा छंदात रमून जातील. तुम्ही आज बिनधास्त वृत्तीने वागाल आणि कोणाचीही पर्वा करणार नाही.
कर्क आणि सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. कर्क राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या स्वभावाचे फायदे आणि तोटे दोन्ही सहन करावे लागतील. महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार नाही. सिंह राशीच्या व्यक्तींच्या घरातील लोकांचा त्यांच्या निर्णयांना विरोध कायम राहील, ज्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्याव्यक्तींनी आज विशेषतः सावधगिरी बाळगावी. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुम्ही आर्थिक धाडस करायला जाल, पण तुम्ही 'अंथरूण पाहून पाय पसरा' हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे.
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी दिवस संयम ठेवण्याचा आहे. तूळ राशीच्या तरुणांनी आज मोठ्या व्यक्तींचा अपमान करणे टाळावे आणि सभोवतालच्या वातावरणाचा विचार करून वागणे गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काही गोष्टींमध्ये "जे होते ते चांगल्यासाठी" हा विचार करून गप्प बसावे लागेल. नोकरीमध्ये तुमचा अधिकार गाजवण्याची आज गरज भासू शकते. शेवटी, मीन राशीच्या लोकांनी घरामध्ये सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडा ताण जाणवण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.