Zika Virus: ‘एडिस’ डासामुळे ‘झिका’चा सं‌सर्ग

Aedes Mosquito: गोव्यातील रहिवाशांना डासांपासून होणाऱ्या व्हायरल संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्याची सूचना
Aedes Mosquito: गोव्यातील रहिवाशांना डासांपासून होणाऱ्या व्हायरल संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्याची सूचना
Mosquito Dainik Gomantak

महाराष्ट्रात झिका व्हायरसच्या प्रकरणांची नोंद झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना विशेष सूचना जारी केल्या. मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, गोव्यातील रहिवाशांना डासांपासून होणाऱ्या व्हायरल संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्यास आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

झिका’ (Zika) व्हायरस हा ‘एडिस’ डासाद्वारे माणसांमध्ये पसरलेला फ्लेविव्हायरस आहे, जो डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रसार करतो. झिका व्हायरस लैंगिक किंवा रक्त संक्रमणाद्वारे देखील प्रसारित केला जाऊ शकतो, असे डॉ. चित्रलेखा नायक यांनी सांगितले.

डॉ. नायक यांच्या मते, माणसांमध्ये संसर्ग अनेकदा लक्षणे नसलेला किंवा सौम्य असतात, ज्यांचे डेंग्यू, व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शन, इन्फ्लूएंझा किंवा व्हायरल ताप असे चुकीचे निदान दिले जाऊ शकते. ‘झिका’ व्हायरसमध्ये कमी दर्जाचा ताप, डोकेदुखी, अस्वस्थता, खाज सुटणे, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, सांधे आणि स्नायू वेदना, जे संसर्गानंतर तीन ते १४ दिवसांनी दिसून येतात आणि दोन ते सात दिवस टिकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com