Yuri Alemao : भाजपला 'गोवा छोडो' असे सांगण्याची वेळ आली आहे

आगामी पंचायत निवडणुकांमध्ये फुटीरतावादी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा पराभव करून गोवा वाचवूया, असे आवाहन काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केले आहे.
Yuri Alemao slams bjp government
Yuri Alemao slams bjp government संग्रहित
Published on
Updated on

पणजी : 1942 मध्ये महात्मा गांधींनी "करेंगे या मरेंगे" अशी घोषणा देऊन "भारत छोडो आंदोलन" सुरू केले. आज असंवेदनशील भारतीय जनता पक्षाला ‘गोवा छोडो’ सांगण्याची वेळ आली आहे. आगामी पंचायत निवडणुकांमध्ये फुटीरतावादी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा पराभव करून गोवा वाचवूया, असे आवाहन काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केले आहे.

(Yuri Alemao slams bjp government)

Yuri Alemao slams bjp government
Panjim : पणजीतील दिवजा सर्कलवर नदीपात्रात मिळाला अज्ञाताचा मृतदेह

गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कुशासनामुळे गोव्यातील जनता त्रस्त आहे. खाणकाम बंद आहे, पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे आणि एकूणच आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे गोव्यात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे.

शिवाय गोव्यातील तरुण बेरोजगार आहेत, गरजूंना सरकारकडून वेळेवर मदत मिळत नाही. सरकार अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा कोणताही कृती आराखडा नसताना केवळ वायफळ खर्च करत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी भाजप सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. न्यायालयांच्या हस्तक्षेपानंतरच सरकारला घटनात्मक निकषांनुसार निवडणुका घेणे भाग पडले.

मी पुन्हा एकदा गोव्यातील जनतेला आवाहन करतो की, भाजपने पाठिंबा दिलेल्या सर्व उमेदवारांचा पराभव करावा आणि जे गोव्याच्या अस्मितेचे आणि पर्यावरणाचे रक्षण करतील त्यांनाच निवडून द्यावे.

लोकमताचा आदर न करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. गोमंतकीयांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे म्हणत त्यांनी भाजपवर सणसणीत टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com