Goa Police: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या युवकास अटक

हणजुणे पोलिसांची कारवाई
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Anjuna Crime: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका युवकास गोवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, पोलिस उपनिरीक्षिक स्नेहा सवाल यांनी धाड टाकून संशयितास ताब्यात घेतले.

Goa Police
Goa Police: गोव्यातून चोरलेली कार मुरूडेश्वरमध्ये मिळाली! केरळच्या चोरट्यालाही अटक

सुकुमार अमल महांता (वय २७ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मोरजी येथील ला काबुना हॉटेलमध्ये काम करत असून मूळचा मोहिपूर, दक्षिण दिनाजपूर पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडे 1723 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला आहे. तो गांजा असल्याचा संशय आहे. त्याची बाजारातील किंमत 1 लाख 80 हजार रूपये इतकी आहे. एसडीपीओ जिवबा दळवी यांनी सांगितले की, एनडीपीएस अॅक्टनुसार त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com