Goa Police: गोव्यातून चोरलेली कार मुरूडेश्वरमध्ये मिळाली! केरळच्या चोरट्यालाही अटक

कोलवाळ पोलिसांची कामगिरी
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: गोव्यातील कोलवाळ येथून चोरीला गेलेली एक कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कार कर्नाटकातील मुरूडेश्वर येथून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच ही कार चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हाशिम असे या चोरट्याचे नाव आहे.

Goa Police
Goa Crime: कॅसिनोमध्ये पैसे हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाची नैराश्यातून आत्महत्या, 2 तरूणींविरोधात गुन्हा

कोलवाळ पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी हाशिम ए. एम. (वय 22) याला अटक करण्यात आली आहे. हाशिम हा मूळचा केरळमधील त्रिशुर येथील आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आहे.

हाशिम याने कोलवाळ येथून 31 मे रोजी बॅलेनो कार (जीए 05 टी 5490) चोरली होती. त्यानंतर कर्नाटकात मुरूडेश्वर येथे त्याने कोर सोडली होती. पोलिसांनी कारसह त्यालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.

Goa Police
Goa Accident: भावाला भेटण्यासाठी यूपीतून गोव्यात आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचा मृत्यू; प्राण्याला वाचवताना दुचाकीचा अपघात

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी, कोलवाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ महाजिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस स्थानकाच्या पथकाने हा तपास केला.

या पथकात पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक, हेड कॉन्स्टेबल रूपेश कोरगावकर, सुधीर परब, पोलिस कॉन्स्टेबल सुलेश नाईक यांचा समावेश होता. गुन्हा घडल्यापासून हे पथक संशयिताच्या मागावर होते. पथकाने पूर्ण क्षमतेने सर्व प्रयत्न करत शोध घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com