Goa Business|केळशीतील युवकाचा व्यवसायाचा फंडा

सकारात्मक : मधमाशी पालनातून स्वयंपूर्णतेकडे; तीन ठिकाणी केंद्रे कार्यरत
beekiping
beekiping Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

मडगाव: हल्ली ‘स्वयंपूर्ण भारत, स्वयंपूर्ण गोवा’ वगैरे घोषणा वरचेवर कानावर पडतात वा वाचायला मिळतात; पण मधमाशी पालनासारखा व्यवसाय स्वीकारून आणि त्यात स्वतःला पूर्णतः झोकून देणारा विरळाच. पण या व्यवसायातून स्वयंपूर्ण होण्याची किमया सासष्टीतील केळशी गावातील एका युवकाने केली आहे.

(Youth business Idea in salcete goa)

beekiping
Goa Covid Update| गोव्यात राष्ट्रीय स्तरापेक्षाही चौपट संक्रमण दर

लेस्ली परैरा हा युवक आखाती देशात कार्गोवर रोजगाराला होता; पण आपल्या गावची ओढ त्याला तेथे स्वस्थ राहू देत नव्हती. आपल्या गावासाठी, तेथील लोकांसाठी काहीतरी करावे, असे त्याला वाटत असे; पण नेमके काय करावे, ते ठरत नव्हते. अशाच द्विधा मनःस्थितीत एकदा गोव्यात आला, तो आखातात परत गेलाच नाही.

येथे कुक्कुट पालन केंद्र सुरू करण्याचे त्याने ठरवले; पण प्रत्यक्षात शॅक सुरू केले. तेही चांगले चालत होते; पण घरगुती कारणामुळे त्याने त्यातून अंग काढून घेतले आणि काही दिवसांनंतर मधमाशी पालनाकडे वळला. स्वतःच्या जागेत त्याने मधमाशांच्या पेट्या ठेवल्या. पण जागा मर्यादित होती. नंतर त्याने तिळामळ-केपे येथील डॉन बॉस्को संस्थेत या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्याला या व्यवसायातील बारकावे तसेच तांत्रिक माहिती मिळाली.

शिक्षणार्थी खूप; पण व्यावसायिक कमीच

लेस्ली म्हणाले की, डॉन बॉस्कोत तीन-तीन महिन्यांची प्रशिक्षण सत्रे घेऊन नवनवी माहिती देण्याबरोबरच उजळणीही घेतली जाते. त्याचा चांगला फायदा होतो. खरे तर सरकारकडे अनेक चांगल्या योजना आहेत. खादी बोर्डातर्फे त्याची अंमलबजावणी होते; पण त्याचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मर्यादितच असते. डॉन बॉस्को संस्थेतून 300 ते 400 जणांनी प्रशिक्षण घेतले; पण प्रत्यक्ष व्यवसाय करणारे हाताच्या बोटांवरच मोजता येतील एवढेच आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

beekiping
Sonali Phogat Case|सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात राजकीय हस्तक्षेप! कुटुंबाचा आरोप

अर्धवेळ नव्हे, पूर्णवेळ व्यवसाय!

त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा अत्यंत किफायतशीर व्यवसाय आहे; पण त्यासाठी त्यात पूर्णत: झोकून देण्याची गरज आहे. सध्या या क्षेत्राकडे अर्धवेळ व्यवसाय म्हणून पाहिले जाते. पांढरपेशा नोकरीतील लोक निवृत्तीनंतर त्याकडे वळतात; पण ते योग्य नव्हे. मलाही प्रथम तसेच वाटत होते. पण डॉन बॉस्को संस्थेत मिळालेल्या प्रशिक्षणानंतर माझा दृष्टीकोन बदलला.

वर्षाला 40 किलो मध उत्पादन

मधमाशी पालन मोठ्या प्रमाणात केल्याखेरीज ते किफायतशीर ठरणार नाही, हे समजल्यानंतर लेस्लीने जागेचा शोध सुरू केला. केळशीतील जैवविविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी त्याला आपली जागा दिली. त्यानंतर त्याने धर्मापूर, करमणे या भागात मधमाशी पालन केंद्रे सुरू केली. त्यातून त्याला वर्षाला किमान ४० किलो मधाचे उत्पादन मिळते. एवढेच नव्हे, तर त्याने स्वतःचा ब्रॅण्डही विकसित केला अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com