Goa: "जोत" बांधून शेती नांगरणी करणारा पिळगावातील 'युवा शेतकरी'

डिचोली (Bicholim) तालुक्यातील पिळगाव गावातील काशीनाथ वामन पेडणेकर (Kashinath Waman Pednekar) या शेतकऱ्यांने अजूनही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.
Kashinath Waman Pednekar
Kashinath Waman PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: काळ बदलत आहे, तसतसा विविध क्षेत्रात बदल होतानाच पारंपरिकताही हळूहळू काळाच्या पडद्याआड होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern Technology) आता शेती व्यवसायातही बदल होत आहे. बैल वा रेड्यापाड्याचे "जोत" बांधून शेतीची नांगरणी करण्याचा प्रकारही आता कालबाह्य होऊ लागला आहे. बहूतेक ठिकाणी तर आता या परंपरेचे दर्शनही होत नाही. त्यातल्या त्यात अजूनही काही मोजकेच शेतकरी ही परंपरा अर्थातच जोताला हात धरून आहेत. यापैकीच एक म्हणजे डिचोली (Bicholim) तालुक्यातील पिळगाव गावातील काशीनाथ वामन पेडणेकर (Kashinath Waman Pednekar) या शेतकऱ्यांने अजूनही ही परंपरा टिकवून ठेवली आहे. आजही ते "जोत" बांधून शेतीची नांगरणी करीत आहेत.

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पंचविशीतील मुलगा कृष्णा पेडणेकर हाही फावल्या वेळेत हातात नांगर धरून शेतीत उतरत आहे. सध्या तब्येतीच्या कारणामुळे काशिनाथ पेडणेकर यांना शेतीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु त्यांचे पूत्र कृष्णा ही परंपरा पुढे नेत आहेत. पेडणेकर यांनी यंदाही आपल्या शेतीत पारंपरिक पद्धतीने शेतीची नांगरणी केली आहे. विशेष म्हणजे पेडणेकर हे 'जोत' बांधून शेतीची नांगरणी करतात. आपल्या आजोबा- पणजोबापासून 'जोत' बांधण्याची परंपरा चालत आली आहे. असे काशिनाथ पेडणेकर यांनी सांगितले.

Kashinath Waman Pednekar
सुदिन ढवळीकरांच्या मगोशी हात मिळवणी करण्याचा प्रश्नच नाही : मनोज परब

आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम

मजूरवर्गाची कमतरता म्हणा किंवा बदलत्या काळानुसार म्हणा कृषी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यापासून कृषी व्यवसायातील पारंपरिकता हळूहळू दुरावत चालली आहे. आता आधुनिक यंत्र वा अवजारे वापरण्यावर शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. कृषी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यापासून आता बहूतेक भागात बळीराजा पॉवर ट्रीलर आणि ट्रॅक्टरच्या (Tractor) साहाय्याने शेती नांगरणीची कामे करताना दिसून येत आहे.

मात्र डिचोली तालुक्यातील धुमासे, कुडचिरे आदी काही मोजक्याच भागात अजूनही "जोत" बांधून शेती नांगरणी करण्यात येते. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे. एकंदरीत सध्याची स्थिती पाहता आधुनिक तंत्रज्ञान त्यातच अनास्थेमुळे शेती व्यवसायातील 'जोत' या पारंपरिक प्रकारावर परिणाम झाला असल्याचे जाणवत असतानाच, कृष्णा हा युवक मात्र नांगर हातात धरून नांगरणी करण्याची परंपरा जोपासून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com