World Mosquito Day: डासांच्या आजारांपासून वाचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ; डॉ. कल्पना महात्मे

World Mosquito Day: डेंग्यूच्या डासाला ५ मिली जरी पाणी मिळाले तर त्यात तो शेकडो अंडी घालू शकतो; शहरीकरण, स्थलांतर, कचरा, अस्वच्छता यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये वाढ
World Mosquito Day: डेंग्यूच्या डासाला ५ मिली जरी पाणी मिळाले तर त्यात तो शेकडो अंडी घालू शकतो; शहरीकरण, स्थलांतर, कचरा, अस्वच्छता यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये वाढ
MosquitoesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, नागरिकांचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर होणारे स्थलांतर, कचरा, अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होत आहे. सरकार आपल्या बाजूने योग्य ती सर्व काळजी घेत आहे, परंतु यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे आरोग्य संचालनालयाच्या उपसंचालक डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

त्या जागतिक डास दिनाच्या निमित्ताने ‘गोमन्तक’शी बोलत होत्या. डॉ. महात्मे म्हणाल्या, राज्यात सध्या डेंग्यूंचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. सामान्यतः एप्रिल ते सप्टेंबर या काळात राज्यातील विविध भागात डेंग्यूचे रूग्ण सापडतात.

राज्यातील स्थानिक नागरिकाला मलेरिया झालेला रूग्ण आमच्याकडे नाही. नागरिकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की जर डेंग्यूच्या डासाला ५ मिली जरी पाणी मिळाले, तर त्यात तो शेकडो अंडी घालू शकतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सात दिवसांपेक्षा अधिक काळ कसलेच पाणी साचून राहणार नाही, याची दखल प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःचा बचाव कसा कराल?

डासांपासून बचाव करण्यासाठी डास पळवणारी क्रीम त्वचेवर लावा.

संरक्षणात्मक कपडे घाला डास चावणे कमी करण्यासाठी तुम्ही लांब बाहीचे टॉप, पँट आणि मोजे यांनी शरीर झाकून घेऊ शकता.साचलेले पाणी काढून टाका: साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, त्यामुळे बादल्या, फ्लॉवर पॉट्स किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये साचलेले पाणी रिकामे करा.

बेड नेट वापरा : झोपताना, डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मॉस्क्यूटो नेट वापरा, विशेषतः मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात ही नेट आवर्जून वापरावी.

पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी डास सर्वात जास्त सक्रिय असतात, त्यामुळे या काळात घरातच राहण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा, डासांपासून होणाऱ्या रोगांचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधच महत्त्वाचा ठरतो. सतर्क राहा आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे डासांपासून संरक्षण करा.

१८९७ पासून सुरुवात

१८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉसच्या ‘अनोफिलीस डास मलेरियाचे परजीवी मानवांमध्ये संक्रमित करतात’ या शोधाची आठवण म्हणून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी डासांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. डास चावल्याने मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार होतात. मात्र हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश डासांपासून दूर राहणे आणि त्यांना होणाऱ्या आजारांबाबत लोकांना जागरूक करणे हा आहे.

World Mosquito Day: डेंग्यूच्या डासाला ५ मिली जरी पाणी मिळाले तर त्यात तो शेकडो अंडी घालू शकतो; शहरीकरण, स्थलांतर, कचरा, अस्वच्छता यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये वाढ
Dengue Mosquito: फ्रिजमध्ये होऊ शकते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती, अशी घ्या काळजी

गोव्यात ५० प्रकारचे डास

गोव्यात ५० हून अधिक प्रकारचे मच्छर आढळतात, परंतु सर्वच डास हे घातक नसतात. यापैकी केवळ तीन प्रकारचे डास म्हणजेच एडी, एनफेलेक्स आणि क्युलेक्स आहेत. या तीन प्रकारच्या डासांमुळे आजार पसरतात अन्य डास हे तसे घातक नसल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

जागृतीसाठी प्रयत्न

गोवा सरकारच्या आरोग्य संचालनालयावतीने राज्यात डासांपासून होणाऱ्या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. गरजेनुसार धूर फवारला जातो, शाळा, ग्रामपंचायत तसेच विविध गटांना डासांपासून होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, याची माहिती दिली जाते. केंद्र सरकारने जागतिक डास दिनानिमित्त राज्यभर जागृती तसेच इतर कार्यक्रम करण्यास सांगितले आहे, असे डॉ. महात्मे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com