COVID19 Goa: लॉकडाऊन बद्दल प्रमोद सावंत यांचे महत्वाचे विधान...

Chief Minister Pramod Sawant will take a decision on the lockdown by Saturday
Chief Minister Pramod Sawant will take a decision on the lockdown by Saturday
Published on
Updated on

पणजी: कोरोना (COVID19) परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी संचारबंदी (Curfew) लागू केलेली आहे. केंद्राच्‍या सहकार्याने ऑक्सिजनची समस्‍या (Oxygen Crisis) आता संपुष्‍टात येत असून कोरोनामुळे मृत्‍यू होण्‍याचेही प्रमाण कमी होत आहे. आरोग्‍य यंत्रणेचा आढावा घेण्‍यासाठी इस्‍पितळांना भेटी देऊन सूचना केल्‍या जात आहेत. त्‍यामुळे संचारबंदीसंबंधी पुढे काय? याबाबतचा निर्णय शनिवारी घेण्‍यात येईल.(Will Goa extend lockdown? Decision on Saturday)

लोकांनी सावधगिरी बाळगून कोविड नियमांचे पालन करावे, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. कोविड महामारी व वादळामुळे झालेली पडझड या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी पेडणे सरकारी इस्पितळ व कोविड उपचार केंद्राला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. पेडणे तालुका कोरोनामुक्त करण्याचा सरकारचा संकल्प मुख्‍यमंत्र्यांनी केला.

दरम्यान, राज्यात गेल्या 9 दिवसांत 18 हजार 335 कोरोनाबाधीत सापडले, तर तब्बल 499 कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) व आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे वारंवार गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी, तसेच सुपरस्पेशालिटी इस्पितळ आणि इतर कोविड इस्पितळांना भेटी देऊन सर्व काही सुरळीत चालल्याचे सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. आज दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 31 जणांना आपला जीव गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com