Plastic Ban: दुकानदारांवरच कारवाई का? प्लास्टिकबंदी कारवाईवरून वाळपईतील व्यापाऱ्यांचा सवाल; पालिकेची करडी नजर

Valpoi Plastic Ban: एखादा दुकानदार प्लास्टिक पिशवी देताना दिसला किंवा त्याच्या दुकानात प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास हजाराचा दंड ठोठावला जात आहे.
Plastic Ban Valpoi
Plastic Ban ValpoiDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सरकारतर्फे स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली प्लास्टिक हटाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम राबविताना केवळ दुकानदारांना वेठीस धरले जाते. सध्या वाळपईतील दुकानदारांवर वाळपई पालिकेची अगदी करडी नजर आहे.

एखादा दुकानदार प्लास्टिक पिशवी देताना दिसला किंवा त्याच्या दुकानात प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास हजाराचा दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे दुकान व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केवळ हा दंड व्यावसायिकांना का दिला जातो. जे ग्राहकही प्लॅस्टिक पिशव्या खरेदी करतात किंवा बाजारात फिरताना लोकांच्या हातात पिशवी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल दुकान व्यावसायिक करीत आहेत. प्लॅस्टिक हटाव मोहिमेत सर्वांवर करडी नजर ठेवून सर्वांवर समान कारवाई हवी आहे.

Plastic Ban Valpoi
Plastic Pollution: प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत भारताच्या नावावर नकोसा 'रेकॉर्ड'; चीन, नायजेरियाही अग्रेसर!

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीसाठी व त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणीसाठी केवळ दुकानदारांवरच नव्हे तर वापर करणाऱ्या सर्वांवर कारवाई होण्याची गरज आहे. बाजारात फिरताना प्लॅस्टिक पिशवी दिसल्यास ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई केली तरच ग्राहकांनाही शिस्‌त लागेल व सरकारची प्लॅस्टिक हटाव मोहीम यशस्वी होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

Plastic Ban Valpoi
Plastic Bag Ban Bicholim: ‘सिंगल यूज प्लास्टिक’ बंदीचे तीनतेरा! प्रशासनाकडून दुर्लक्ष; डिचोलीत पिशव्यांचा सर्रास वापर

...तर लोक बदलतील!

वाळपईत नेहमीच पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी फिरत असतात. ते ग्राहकांच्या हातातील प्लॅस्टिक पिशव्यांकडे लक्ष देत नाहीत. एखाद्या जरी ग्राहकावर दंडात्मक कारवाई झाली तर आपोआप लोकही भीतीपोटी बदलतील. ग्राहकांवरही कारवाई सुरू केल्यास आपोआप लोकच कापडी पिशव्या घराकडून घेऊन येतील, असा व्यावसायिकांचा दावा आहे.

आमच्यावर पालिकेतर्फे नेहमीच लक्ष ठेवले जाते. व प्लॅस्टिक कॅरीबॅग आढळल्यास दंड ठोठावला जातो. आमच्याकडे येणारे ग्राहक हे एक जरी वस्तू खरेदी केली तर प्लॅस्टिक पिशवी मागतात. जर ती त्यावेळी दिली नाहीतर नाक मुरडत जातात. व पुन्हा तुमच्या दुकानात येणार नाही, अशी तंबी देतात. शासनाने केवळ दुकानदारांना टार्गेट करू नये.

जितेंद्र काटकर, वाळपई, दुकानदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com