Indigo Flight: दिल्ली विमानतळावर 14 जानेवारीच्या सकाळी या हंगामातील सर्वात दाट धुके होते. यादिवशी पहाटे 4 ते 9 या वेळेत दृश्यमानता शून्य होती. यामुळे या पाच तासांत येथून एकही विमान उड्डाण करू शकले नाही आणि केवळ 15 उड्डाणे उतरू शकली.
मात्र 14 जानेवारीला सकाळी 9 नंतर धुके हटताच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग सुरू झाले. अशा परिस्थितीत दिल्ली विमानतळावरून सकाळी 8.40 वाजता गोव्यासाठी निघालेले इंडिगोचे विमानाचे उड्डाण तब्बल आठ तास उशीराने का झाले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विमान उड्डाणासाठी हवामान अनुकूल असताना विमान उड्डाण का झाले नाही, हा खरोखर तपासाचा विषय आहे असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पण, इंडिगोने विमानाच्या उड्डाणाला आठ तास उशीर का केला याचा शोध घेतला जाईल, असेही अधिकारी म्हणाले.
दिल्ली विमानतळावर सकाळी 9 वाजता हवामान ठीक झाले होते. सहसा अशा परिस्थितीत विमान कंपन्या त्यांच्या उड्डाणे नंतर टेकऑफ करण्यास प्राधान्य देतात.
दरम्यान, वैमानिक आठ तासांपेक्षा जास्त ड्युटी करू शकत नाहीत, असे विमान वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत फ्लाइटला उशीर झाल्यास त्यांच्या ड्युटी अवर्स संपण्याच्या भीतीने अन्य क्रूला बोलावावे लागते. इंधनाचाही तुटवडा हे कारण असू शकते, त्यामुळे अनेकवेळा विमाना उड्डाणाला उशीर होतो.
दिल्लीतून गोव्यात येणाऱ्या विमान उड्डाणाला विलंब झाल्याने एक प्रवासी पायलटवर धावून गेल्याची घटना घडली. या घटनेची दखल घेत प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली नंतर तात्काळ जामीनही देण्यात आला.
तसेच, 14 जानेवारीला गोव्याहून दिल्लीला येणारे इंडिगो विमान सुमारे 16 तासांनंतर दिल्लीत दाखल झाले. विमान खराब हवामानाचे कारण देत मुंबईकडे वळवण्यात आले.
याविमानातील प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवण करताना दिसत आहेत. इंडिगोच्या याही विमानाला एवढा उशिर का झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.