Fatorda News : मुलांच्या हाती ‘स्मार्ट फोन’ देणे घातक! ‘डब्ल्यूएचओ’कडून धोक्याचा इशारा

Fatorda News : पालकांना दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
Fatorda
FatordaDainik Gomantak
Published on
Updated on

Fatorda News :

फातोर्डा, पूर्वीच्या काळात आपले मूल रडू लागले की, पालक हातात एखादे खेळणे थोपवायचे आणि आपसूकच ते मूल रडणं थांबवायचं.

सध्या मूल रडू लागले की, पालक थेट स्मार्टफोनच त्याला सोपवताहेत. मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या लहरी मुलांसाठी अत्यंत धोकादायक असतात. हे माहीत असूनही पालक मुलांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे ‘डब्ल्यूएचओ’ने धोक्याचा इशारा देऊन सावध केले आहे.

आजकाल सर्वांना मोबाईलशिवाय चैनच पडत नाही. मूल रडू लागले, जेवत नसले की, पालक त्याला मोबाईलवर कार्टून दाखवून रडणे थांबवण्याचा प्रयत्न करतात.

मुलेही रडणे थांबवतात,अन् असे अनेकदा घडत असल्याने मुलांचा ओढा मोबाईलकडे वाढतो. मग नंतर मोबाईल मिळाला नाही, तर ती रडू लागतात. नाईलाजाने पालकांना मोबाईल मुलांकडे सोपवावाच लागतो. पण यातून पालकच मुलांचे भवितव्य धोक्याच्या खाईत लोटत आहेत,असे दिसते.

या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.

मुलांची शारिरीक आणि मानसिक वाढही मोबाईलच्या वापरामुळे खुंटते,त्यामुळे किमान ५ वर्षांच्या आतील मुलांकडे मोबाईलसारखे इलेक्ट्रॉनिक साधन सोपवणे धोक्याचे ठरू शकते. समाजात याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे,असे जाणकारांचे मत आहे.

‘डब्ल्यूएचओ’ म्हणते !

घराघरांत मुलंही दिवसभर मोबाईल गेम्स, टीव्ही पाहण्यात मग्न असतात. पण हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून जे तरंग उत्सर्जित होतात ते मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत.

मुलांना जीवघेण्या आजारांपासून वाचवायचे तर चुकूनही त्यांना मोबाईल देऊ नका. सतत मोबाईल वापरल्याने मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास खुंटतो. किमान पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांपासून मोबाईल दूर ठेवा.

Fatorda
Goa Congress: दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने कॅथोलिक उमेदवारच उभा करण्‍यासाठी दबाव

मुलांवर होतात हे परिणाम

  • चष्मा लवकर लागतो

  • हाताचे स्नायू खराब होतात

  • मणक्याचे विकार जडतात

  • अभ्यासाऐवजी गेममध्ये गुंततात

  • मैदानी खेळ खेळत नाहीत

  • मेंदूला चालना मिळत नाही

  • खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते

  • आपला मुलगा दोन वर्षाचा आहे. सहा महिन्यापूर्वी तो रडत असल्याने त्याला मोबाईलवर कार्टून दाखविले होते. नंतर तो रडायचा थांबला होता. आता त्याला मोबाईलची सवय जडली आहे. आता हातात मोबाईल दिला नाही तर तो रडतो.

- सूरज नाईक,पालक

कोणत्याही वयाच्या व्यक्तीवर मोबाईलमधून निघणाऱ्या लहरींचा परिणाम होत असतो. लहान मुले तर नाजूक असतात, त्यांच्या हातात मोबाईल दिल्याने लहरींचा थेट मेंदूवर व डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असतो. तसेच इतर आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मोबाईलपासून दूर ठेवणेच उचित ठरेल.

- डॉ. व्‍यंकटेश हेगडे, मडगाव

माझा तीन वर्षाचा मुलगा असाच सतत मोबाईलमध्ये रमत होता. त्याला व्हिडिओ गेम आणून दिला आता तो या व्हिडिओ गेममधील खेळावर लक्ष देत असतो. तसेच या खेळासाठी त्याला वेळचे बंधन घातले आहे. अशाने त्याची मोबाईलच्या धोक्यापासून मुक्तता झाली. त्यामुळे मी समाधानी आहे.

-अनिल नाईक,सावर्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com