Goa Congress: गुढीपाडव्यानंतरचे दिवस काँग्रेससाठी चांगले असतील; कधी होणार उमेदवारांची घोषणा, भिके म्हणाले...

Goa Congress: गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि आरजीने प्रचारक आघाडी घेतली असताना काँग्रेसच्या उमेदवारांचा मात्र पत्ताच नाही, असे चित्र आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress

अखेर काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त सापडला आहे. गेले काही दिवस भाजप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात प्रचारक आघाडी घेतली असताना काँग्रेसच्या उमेदवारांचा मात्र पत्ताच नाही, असे चित्र आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांना आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उमेदवार कधी जाहीर होतील, असे थेटपणे विचारले असता त्यांनी गुढीपाडव्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार जाहीर होतील, असे उत्तर दिले. गुढीपाडवा हा हिंदूंचा पवित्र सण आहे. यानंतरचे दिवस काँग्रेससाठी चांगलेच असतील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

भिके म्हणाले, भाजपनेही देशभरातील सर्व उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. लोकसभा गोव्यातील मतदान हे तिसऱ्या टप्यात असल्याने काँग्रेस टप्प्याटप्प्याने उमेदवारीबाबत विचार करत आहे.

गोव्यातील मतदान तिसऱ्या टप्प्यात असल्याने काँग्रेस टप्प्याटप्प्याने उमेदवारीबाबत विचार करत आहे. राज्यात बसून आम्हाला उमेदवारीला उशीर झाला असे जरी चाटत असले तरी राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि त्यातही आता आघाडी केल्यामुळे इतर पक्षांशी विचारविनिमय करावा लागतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेसच्या उमेदवारीला उशीर होत आहे; कारण काँग्रेसमध्ये लोकशाही अद्याप जिवंत आहे. काँग्रेसमध्ये केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाते, बाहेरून उमेदवार आणला जात नाही. काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया सुरू आहे.

Goa Congress
Bambolim: कुजीरा स्कूल संकुलात राडा; चाकूने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, एकजण ताब्यात

गोव्यातील मतदान तिसन्या टप्प्यात असल्यामुळे योग्यवेळी उमेद्वार काँग्रेस पक्ष जाहीर करेल कौग्रेसने अद्याप देशभरातील सर्वच उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय भिके म्हणाले.

माफी मागण्यासाठीच देवदर्शन !

भाजपने लोकसभा निवडणुकीत प्रचाराची नव्हे तर देवदर्शनाची पहिली फेरी पूर्ण केली आहे, असा टोला भिके यांनी लगावला. ते म्हणाले काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये गेले. त्यांनी काँग्रेसमधून फुटणार नाही, अशी सर्वधर्मीयांच्या देवांसमोर शपथ घेतली होती.

देवाला त्यांनी फसवले यामुळेच आता माफी मागण्यासाठी त्या आमदारांना घेऊन देवदर्शन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com