Age Of Goa Capital Panaji: जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

Age Of Goa Capital Panaji: ‘स्मार्ट सिटी’ कामाचे निमित्त ः डॉ. नंदकुमार कामत तपासणार मातीचे नमुने
Age Of Goa Capital Panaji
Age Of Goa Capital PanajiDainik Gomantak

Age Of Goa Capital Panaji

पणजी शहराचे नेमके वय काय? शहर कोणत्या कोणत्या टप्प्यात अस्तित्वात आले. पूर्वी नदीचे पाणी कुठवर होते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न डॉ. नंदकुमार कामत करत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निमित्ताने सध्या शहरभर खोदाई करण्यात आली आहे.

ही संधी साधत डॉ. कामत यांनी मातीचे नमुने गोळा केले आहेत. या मातीतून ते पणजीचे वय शोधणार आहेत. पणजी शहर कधी वसवले गेले याविषयी अनेक मते मतांतरे आहेत. कदंब राजा जयकेशी-१ यांच्या कारकिर्दीत अणय्या या त्यांच्या धर्ममंत्र्याने शहर वसवल्याचे सांगण्यात येते, तर पोर्तुगिजांनी जुने गोवेची राजधानी पणजीत हलवून पणजी विकसित केली असेही दाखले इतिहास अभ्यासक देतात.

Age Of Goa Capital Panaji
Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

खरेच या काळात पणजीचा उगम झाला की पणजी आधीपासूनच अस्तित्वात होती हे अद्याप शास्त्रीयदृष्ट्या ठरलेले नाही. यामुळे पणजीचे शास्त्रीय वय निश्चित होणे आवश्यक आहे. ते काम आता डॉ. कामत यांनी हाती घेतले आहे.

डॉ. कामत यांना आझाद मैदान आणि महात्मा गांधी मार्गावर चार मीटर खोलवरचे पाण्याचे नमुने मिळाले आहेत. ती माती नसून टाईम कॅप्सुल आहे असे वर्णन डॉ. कामत यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या परिसरात तुटलेल्या शिंपल्यांत एकसमान वालुकामय थर सापडला आहे.

हे नमुने नदी पुन्हा या भागात शिरून हा परिसर पुन्हा बुडवेल की काय याचे उत्तर देणार आहे. हे नमुने गोळा केलेल्या जागेवरून नदी केवळ १९५ मीटरवर आहे. नदी आपल्या मुखाजवळ आपला प्रवाह बदलते असा अनुभव आहे. त्यामुळे त्याचाही अभ्यास यासंदर्भात करावा लागणार आहे.

३५ मीटर खोलवरचे घेतले नमुने

जुन्ता हाउसजवळ ३५ मीटर खोलवरच्या मातीचे नमुने डॉ. कामत यांना घेता आले. काळ्या आम्लीय संक्षारक खारफुटीच्या दलदलीचे ते नमुने आहेत. तेथे काम करणाऱ्या अभियंत्यांनी एका अभियांत्रिकी आव्हानांचा त्यांनी कधी सामना केला नव्हता असे कामत यांना सांगितले आहे.

गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आजवर एवढ्या खोलीवरच्या पणजीतील मातीचे नमुने तपासलेले नाहीत. एक सेंटिमीटर मातीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. १९६४ पासून हा भाग परिचित असल्याने कामत यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

प्राथमिक पुराव्यावरून शहरात येणाऱ्या मांडवी नदीच्या प्रवाहाची दिशा नैसर्गिकरीत्या व मानव हस्तक्षेपाने बदललेली दिसत आहे. पूर्वी टेकडीला नदीचे पाणी टेकत असे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिर ते आयनॉक्स आणि आयनॉक्स ते टुरिस्ट हॉस्टेलपर्यंतचा परिसर पाण्याखाली जात असे, असे पुरावे सापडले आहेत.

- डॉ. नंदकुमार कामत, पर्यावरण अभ्यासक

Edited By - अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com