Waterfalls In Goa : राज्यातील 14 धबधबे खुले; वन खात्याचा आदेश

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नेमणार
Waterfalls in Goa
Waterfalls in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Waterfalls In Goa : राज्य सरकारने कमी धोकादायक असलेले अभयारण्यातील १४ धबधबे लोकांसाठी खुले केले आहेत. त्यासंदर्भातचा आदेश वन खात्याने जारी केला आहे. हे धबधबे खुले करताना सावधगिरी बाळगण्यासाठी तेथे वन कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी धांगडधिंगाणा केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे वन खात्याने म्हटले आहे.

हल्लीच काही दिवसांपूर्वी मैनापी धबधब्यावर दोघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर वन खाते खडाडून जागे झाले. धबधब्यावर तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिक लोकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असल्याने सुरक्षेसाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

वनक्षेत्रातील धबधब्यांवर जाण्यास मात्र खात्याने प्रवेश बंद केला आहे. या कमी धोकादायक धबधब्यांवर जाण्यास लोकांना परवानगी देण्यात आली असली तरी दूधसागर व इतर धोकादायक असलेले धबधबे बंद ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळे गेल्या रविवारी मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर जाण्यास देण्यात आले नाही.

Waterfalls in Goa
Goa Congress : मोपावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणास काँग्रेसचा विरोध

दूधसागर बंदच, पण...

सरकारने खुल्या केलेल्या 14 धबधब्यांपैकी 11 सत्तरीतील आहेत. त्यात म्हादई अभयारण्यातील पाळी, हिवरे, चरवणे, गुळवली, गुंगुळडे, चिदंबरम, नानेली उकैची खडी - कुमठळ,

म्हादीयानी - गुळेली तर भगवान महावीर अभयारण्यातील मयडा - कुळे व नेत्रावली अभयारण्यातील भाटी- नेत्रावळी या धबधब्यांचा समावेश आहे. दूधसागर मात्र अजून पर्यटकांसाठी खुला केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com