Mapusa News : पाणी आले, पण चिखलासारखे; बार्देशात पाणी टंचाई कायम

आल्‍तिनो-म्‍हापसा येथील महिला रस्‍त्‍यावर
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News : गेल्‍या काही दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस पडत असूनही म्हापसा शहरासह बार्देशवासीयांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागतोय. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पातील मुख्य जलवाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या ओढवल्याचे समजते. विशेष म्हणजे, तीन दिवसांनी आज बुधवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा करण्यात आला खरा, मात्र तो मुबलक नव्हता. शिवाय गढूळ पाणी येत होते. सायंकाळी पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे काही भागात पाणीपुरवठा झालाच नाही. दरम्‍यान, आल्‍तिन-म्‍हापसा येथे गेल्‍या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्‍याने महिलांनी रस्‍त्‍यावर उतरून निषेध नोंदविला.

उपलब्ध माहितीनुसार, बार्देशात मागील तीन दिवसांपासून सुरू झालेले पाणीटंचाईचे संकट आज किंचित दूर झाले असले तरी गढूळपणा कायम होता. तालुक्यातील बऱ्याच भागात मर्यादित पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या गुरुवारपर्यंत त्यात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता पाणी विभागाने वर्तविली आहे.

सध्या तिळारीतून होत असलेला पाणीपुरवठा गढूळ असल्याचे पाण्याच्या शुद्धीकरणात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनानुसार करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. म्हापसा पालिका क्षेत्रासह शिवोली, साळगावमधील काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, नादुरुस्त झालेली वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू होते.

Mapusa News
Calangute: वाद 'त्या' दोघांचा, फटका मात्र 240 जणांना; सरकारच्या 'या' निर्णयामुळे पारंपरिक मच्छीमार हवालदिल

आल्तिनोमधील ३५ घरे सहा दिवस पाण्याविना

म्हापसा शहरातील अनेक भागात आज सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा झाला, पण सायंकाळी तो पुन्‍हा ठप्‍प झाला. दुसरीकडे आल्तिन-म्हापसा येथे मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. जवळपास ३५ कुटुंबीयांना हा फटका बसला आहे. त्‍याचा निषेध म्‍हणून आज बुधवारी सायंकाळी या संतप्‍त महिला रस्त्यावर पाण्याच्या बादल्या घेऊन उतरल्‍या व साबांखाच्या पाणीपुरवठा विभागाचा निषेध केला. ‘आमका जाय...आमका जाय...उदय आमका जाय...’ अशा घोषणा त्‍यांनी दिल्या.

Mapusa News
Diabetes Tips For Monsoon: पावसाळा मधुमेहींसाठी त्रासदायक! असे जपावे आरोग्य

मागील सहा दिवसांपासून आम्हाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. त्‍यामुळे दररोज पदरचे पैसे मोडून टँकर मागवावा लागतोय. विकासाच्या बाता मारणाऱ्या सरकारला लोकांना पाणी देणे जमत नाही. मग सरकार कसला विकास साधणार?

अ‍ॅनी परेरा, आल्‍तिनो, म्‍हापसा

सध्या घरकामासाठी आम्‍ही पावसाचे पाणी वापरतोय, तर पैसे मोडून पिण्याचे पाणी विकत आणतोय. साबांखाच्या कार्यालयात विचारपूस केल्‍यास कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही नक्की कुणाकडे दाद मागायची?

माधवी, आल्‍तिनो-म्‍हापसा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com