सत्तरीत कमी क्षमतेच्या जलवाहिनीमुळे पाणीसमस्या

नागरिकांनी जागरूक राहावे : ठिकठिकाणी गळतीमुळे पाणी जाते वाया; मोठ्या प्रमाणात टँकरचा होतो वापर
Water Tanker
Water TankerDainik Gomanatk
Published on
Updated on

सत्तरी तालुक्यातील 70 टक्के गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दाबोस पाणी प्रकल्पामधून होतो. येथील जनता ही नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर सत्तरीत अशी काही गावे आहेत त्या ठिकाणी दररोज टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

सध्या सत्तरीत विकासकामांचा झपाटा सुरू आहे. त्यात काही ठिकाणी नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी नवनवीन प्रकल्प येण्याच्या तयारीत आहेत.

Water Tanker
Vasco : वास्कोत मनोरुग्णाचा पेट्रोल पंपावर हल्ला

सत्तरी पाण्याच्या टंचाईचे मुख्य कारण म्हणजे नळाची जी जलवाहिनी आहे ती कमी क्षमतेची असून पाणी सोडताना जास्त क्षमतेने सोडत असल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचा प्रकारांत वाढ होत आहे.

त्याचबरोबर काही ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने गळती लागून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे आणि संबंधितांकडे तक्रार केली पाहिजे.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सत्तरी तालुक्यातील जलस्त्रोत जपण्यासाठी आणि त्याचबरोबर सत्तरी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी ‘सत्तरी लोकाधिकार मंच’तर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. याच निवेदनाची उपजिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन गुरुवारी (ता.2) सायंकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.

पाणी सोडण्याची वेळ निश्चित

सत्तरीत काही भागांत दिवसाकाठी दोन वेळा पाणी सोडले जाते. तर काही भागांत दिवसाला फक्त एक वेळा पाणी सोडले जात आहे. तेही 2 किंवा 3 तास. काही भाग डोंगरमाथ्यावर येत असल्याने व जलवाहिनी लहान असल्याने पाणी वर चढत नाही. त्यामुळे कमी क्षमतेने पाणीपुरवठा होतो.

चरावणे धरण महत्त्वाचे

चरावणे धरण झाले तर ठाणे पंचायतीबरोबर म्हाऊस पंचायत व नगरगाव पंचायतीला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. यामुळे सुमारे 15 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com