Water pollution : जलप्रदूषणामुळे मिठागर संकटात; सासष्टीत समस्या

Water pollution : सरकारी मदतीची आवश्‍यकता, कामगारांची गरज
Water pollution
Water pollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Water pollution :

मडगाव, मीठ उत्पादनात वाढलेली व्यावसायिकता, जलप्रदूषणाचा मुद्दा, कामगारांची अनुपलब्धता व घटणारे नफ्याचे प्रमाण अशा अनेक बाबींमुळे साधारणतः २० वर्षांपूर्वीपासून सासष्टी तालुक्यातील अनेक भागात दिसणारी मिठागरे हळूहळू नामशेष होत चालली आहेत.

अजूनही राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केल्यास मीठ उत्पादनासाठी पुढे सरसावण्याची तयारी काही शेतकरी दाखवत आहेत.

सासष्टी तालुक्यात चिंचणी, असोळणा, नावेली, केळशी, मडगावनजीक खाडी परिसरात काही ठिकाणी काही वर्षांपूर्वी मिठागरे दिसून यायची. शेतीच्या कामांतून उसंत घेत शेतकरी मीठ उत्पादनाकडे वळायचे. सासष्टीत ऑक्टोबर महिन्यापासून बांधांची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केली जात असायची.

शेतात गरजेपेक्षा जास्त पाणी येऊ नये, यासाठी बांधांची डागडुजी गरजेची असायची. त्याकाळी बहुतांशी लोक मीठ तयार करत असल्याने एकाच शेतकऱ्यावर जास्त भार येत नसे. ऑक्टोबरपासून सुरू झालेली लगबग मे महिन्यापर्यंत मीठनिर्मितीपर्यंत सुरू असायची. पावसाळ्यात हे काम नसल्याने शेती करणे, मासेमारी करण्याच्या व्यवसायाकडे लक्ष दिले जात असायचे.

साधारण २५ वर्षापूर्वी आयोडिनयुक्त मीठ खाण्याचे फायदे सांगितले जाऊ लागले. शेतातून उत्पादित मिठाकडे लोकांकडून दुर्लक्ष होऊ लागले.

आयोडीनची मात्रा आवश्यक त्या प्रमाणात मिळण्यासाठी विविध कंपन्यांनी मीठ उत्पादित करत आयोडिनयुक्त मीठ विक्रीला आणले. खाडीच्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या मिठाचे उत्पादन घटण्यास सुरुवात झाली.

Water pollution
Goa politics: अल्पसंख्याक मतदारसंघ असल्याने विरोधकांना पाठबळ

युवकांचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांकडून उत्पादित मिठाचा वापर खाण्यासाठीच नाही, तर माडांना खत म्हणूनही केला जात होता. उत्पादनातून फायदा कमी व्हायला लागल्याने व युवकांचाही नोकरीकडे कल वाढू लागल्याने मिठागरांत काम करण्यासाठी मनुष्यबळ कमी झाले आहे.

काही मिठागरांची जमीन ही भाडेपट्टीवर कसली जात असे, जमीन जाण्याच्या भीतीनेही जमीन मालकांनी अनेकांना शेती करण्यासह मीठ उत्पादन करण्यापासून रोखले. यासह जलप्रदूषणाचा मुद्दाही मिठागरे ओस पडण्यास कारणीभूत ठरली आहेत.

Water pollution
Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या नावांवर आज चर्चा

काही वर्षापूर्वी चिंचणी गावात मोठ्या प्रमाणात मीठ निर्मिती होत असे. आयोडिनयुक्त मीठ बाजारात आल्यानंतर गोव्यातील मिठागरे बंद पडत गेली.

राज्य सरकारने बांधांची डागडुजी, जमिनींच्या मशागतीसाठी सहकार्य केल्यास गावातील शेतकरी मीठ उत्पादनात आत्मनिर्भर होतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व अनेक पर्यटकांना मीठ उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवून पर्यटन वाढही शक्य आहे.

- फ्रँक व्हिएगस, पंच, चिंचणी-देवसू.

गावातील मिठागरांतून मीठ उत्पादन करण्यासाठी आमचे कुटुंबीयही कार्यरत होते. अनेकजण मीठ उत्पादन कसे करतात ते पाहावयास यायचे. २५ वर्षांपासून मिठागरे बंद असल्याने सध्या या जमिनींची पूर्णपणे वाट लागलेली आहे.

आता करायचे म्हटल्यास नवी सुरुवात करावी लागेल व खर्च जास्त येणार आहे. सरकारकडून उत्पादकांना आर्थिक मदत मिळाल्यास पुन्हा मिठागरांतून मीठ निर्मिती शक्य होईल.

- इनासिओ आंताव, मीठ उत्पादक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com