Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त काही भागात अनियमित पाणीपुरवठा! चेंबर जोडकामावेळी जलवाहिनी फुटली

Smart City Panjim: पणजीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नगर विकास प्राधिकरणाच्यावतीने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मलनिस्सारण सेवेच्या चेंबरला आता इमारती व घरांच्या वाहिन्यांचे जोडकाम करण्यास सुरुवात झाली आहे.

Panaji Sewerage Chamber ConnectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नगर विकास प्राधिकरणाच्यावतीने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मलनिस्सारण सेवेच्या चेंबरला आता इमारती व घरांच्या वाहिन्यांचे जोडकाम करण्यास सुरुवात झाली आहे. या कामामुळे भाटलेतील नळपाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने दोन दिवस भाटले, तांबडीमाती व मळ्याच्या काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

पणजी शहरातील मलनसिस्सारण सेवेला तीस वर्षांहून अधिक काळ ओलांडल्याने भूमिगत असलेल्या या वाहिन्या खराब झाल्याने स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत संपूर्ण पणजी शहर, रायबंदर परिसरातील मलनिस्सारणाच्या नव्याने भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडअंतर्गत नगर विकास प्राधिकरणाने हे काम घेतले होते. शहरातील बांदोडकर मार्ग सोडून सर्व मार्गावर मलनिस्सारणाचे चेंबर निर्माण करण्याचे व नव्याने मोठ्या व्यासाची भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

Smart City Panjim: पणजीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नगर विकास प्राधिकरणाच्यावतीने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मलनिस्सारण सेवेच्या चेंबरला आता इमारती व घरांच्या वाहिन्यांचे जोडकाम करण्यास सुरुवात झाली आहे.
Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त कामांचा धूमधडाका! '18 जून'सह तीन मार्गांचे काम लवकरच सुरु होणार

चेंबर निर्माण झाल्याने इमारतींच्या सांडपाण्याची सुविधा थेट चेंबरला जोडण्याचे काम आता सुरू झाले आहे. आल्तिनोवरून भाटलेत जाणाऱ्या उतरणीवर असलेल्या चेंबर जोडकाम करीत असताना शनिवारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे या वाहिनीद्वारे ज्या भागात पाणी पुरवठा होत होता, तो बंद झाला. त्यामुळे रविवारी भाटले, मळ्याचा काही भाग आणि तांबडीमाती परिसरात पाणीपुरवठा झाला नाही. रविवार सुटी असली तरी चेंबरजोडचे काम सुरू होते, त्याशिवाय फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने सोमवारी नियमित पाणी पुरवठा होईल, असे येथील पर्यवेक्षकाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com