Water Pipeline Burst: काही दिवसांपूर्वी साखळीमध्ये सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणारी जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र सध्या ती पुन्हा फुटली असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
जलवाहिनी फुटल्यानंतर त्याची तक्रार दाखल करून संबंधित विभागाला कळवणे गरजेचे असते. त्यानंतरच दुरुस्ती केली जाते. मात्र साखळीमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असूनही कुणीच पाणी पुरवठा विभागाला याची तक्रार न केल्याने या दुरुस्ती कामाला विलंब झाला. तसेच स्वत: विभागाच्या अधिकाऱ्यांना जरी याची कल्पना असली तरी नागरिकांमधून तक्रार आल्याशिवाय ते दुरुस्ती कामाला सुरुवात करत नसल्याचे चित्र आहे
काही दिवसांमागे ही जलवाहिनी जिथून फुटली होती, तिथेच पुन्हा ती फुटल्याने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असून, नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्यावर पाणी पसरल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.