फातोर्डातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर दामू नाईक यांना विजयी करा: प्रमोद सावंत

माणसे राजकारणात धंधा करण्यासाठी येत असल्याचा आरोप दामू नाईक यांनी स्थानिक आमदारावर केला आहे.
Vote for Damu Naik to develop Fatorda says Chief Minister Pramod Sawant
Vote for Damu Naik to develop Fatorda says Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

2022 पर्यंत गोवा (Goa) राज्य स्वयंपूर्ण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. या साठी फातोर्डेकरांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी दामू नाईक (Damu Naik) विधानसभेत येणे गरजेचे असून यासाठी फातोर्डेकरांनी (Fatorda) त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी निज फातोर्डेकरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एसटी मेळाव्याच्यावेळी बोर्डा येथील मैदानावर केले आहे.यावेळी व्यसपीठावर फातोर्डाचे माजी आमदार तसेच रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, मडगाव नागरपालीजेचे नगरसेवक कामीलो बार्रेटो , सदानंद नाईक, बबिता नाईक, माजी नगरसेविका पिएदाद नोरोन्हा तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.(Vote for Damu Naik to develop Fatorda says Chief Minister Pramod Sawant)

पुढे बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले कि सरकारकडून सामन्यासाठी अनेक योजना राबविण्यायत येत आहेत .या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सरकारने तसेच आपण कोणत्याही जाती व धर्म विषयी राजकारण केले नाही. तसे करणे अयोग्य आहे. मात्र दुर्दैवाने असे राजकारण काहींच्या कडून करण्यात येत आहे . मात्र आमच्या सरकारची योजनासर्वांना समान वागणूक देण्याची आहे . प्रत्येक मनुष्याचा विकास होण्यासाठी सरकारकडून स्वयंपूर्ण योजना राबविण्यात येत असल्याचे मुखमंत्री सावंत यांनी सांगितले आहे. सरकारकडून एकंदरीत २४० योजना राबविण्यात येत असल्याचे शेवटी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Vote for Damu Naik to develop Fatorda says Chief Minister Pramod Sawant
माकाझन येथे उभारणार शैक्षणिक हब : मुख्यमंत्री सावंत

यावेळी दामू नाईक यांनी सांगितले कि 20 वर्षांचा काळ लोटला असून मी राजकारणात आहे . मात्र प्रथमच एसटी समाजाच्या बांधवासाठी अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या पूर्वी अनेक योजना या बांधवासाठी सरकाकडून राबविण्यात आल्या आहेत यांचा फायदा सर्वाना मिळावा आणि ह्या योजना सर्व स्ररावरील लोकांना मिळाव्यात येथील आमदार सरकाररच्या योजनांचा फायदा लोकांना मिळवून देत आहेत आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडून एका कागदावर सही घेत आहेत . अशाने तो सरकाकडून योजनांचे पैसे वसूल करून घेत आहेत .असली माणसे राजकारणात धंधा करण्यासाठी येत असल्याचा आरोपही दामू नाईक यांनी स्थानिक आमदारावर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com