Vishwajit Rane: विश्वजीत राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Vishwajit Rane: वाढदिवस उत्साहात: मुख्यमंत्री सावंत, तानावडे यांनी भरवला केक
Vishwajit Rane:
Vishwajit Rane:Dainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajit Rane:

आरोग्यमंत्री विश्वजीत  राणे यांचा वाढदिवस शनिवारी (ता. २३) कुटुंबीय व विविध मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिनानिमित्त आज दिवसभर विश्वजीत राणे यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी विविध माध्यमांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.

सकाळच्या सत्रात कुळण - साखळी येथे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या आई विजयादेवी राणे, वडील प्रतापसिंह राणे, बहीण विश्वधारा डहाणूकर, पत्नी आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

यावेळी कुटुंबियांसह त्यांचे चाहते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी आई विजयादेवी राणे यांनी पारंपरिक पध्दतीने ओवाळणी केल्यानंतर विश्वजीत राणे यांनी केक कापला.

Vishwajit Rane:
Goa Politics: रेड्डीने दिलेले 60 कोटी भाजपने गोवा निवडणुकीत वापरले

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, संजीव देसाई यांनी राणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विश्वजीत राणे यांना केक भरविला. आज दिवसभर कुळण तसेच पणजी येथे त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com