Goa Politics: रेड्डीने दिलेले 60 कोटी भाजपने गोवा निवडणुकीत वापरले

Goa Politics: कसा खर्च केला तपशील द्या: ‘आप’ची मागणी
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

मद्य घोटाळ्यात तक्रार करणाऱ्या शरदचंद्र रेड्डी याने निवडणूक रोख्यांच्या रूपाने भाजपला दिलेले सुमारे साठ कोटी रुपये गोव्याच्या निवडणुकीत भाजपने वापरले. भाजपने हा पैसा कसा खर्च केला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

आम आदमी पक्षाने शनिवारी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस प्रवक्ते वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, आपच्या युवा आघाडीचे नेते सिद्धेश भगत उपस्थित होते.

वाल्मिकी नाईक म्हणाले, अमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आपच्या नेत्यांकडे पैसे मिळालेले नाहीत. याप्रकरणी मनीष सिसोदिया, संजय सिंग यांना पोलिस कोठडीत ठेवले.

Goa BJP
Water Pollution: राज्यात जलप्रदूषणावरून लपवाछपवी!

ज्या व्यक्तीच्या जबाबानुसार ही कारवाई करण्यात आली, त्या शरदचंद्र रेड्डीला नोव्हेंबर २०२२ मध्ये ईडीने चौकशीसाठी बोलावले, तेव्हा आपण कधीही अरविंद केजरीवाल यांना भेटलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु काही महिन्यांनी रेड्डी यांनी जबाब बदलला आणि मद्यधोरणाविषयी आपण केजरीवाल यांना भेटलो होतो, मद्यधोरणाविषयी चर्चा केली असे सांगताच रेड्डीला जामीन मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com