Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; वास्कोतील घटना

Crime News : यावेळी तिचे वडील वसंत साळस्कर यांनी घटनास्थळी धाव घेताच तेथे वैशाली रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेली त्यांना आढळली.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News :

वास्को, शांतीनगर - वास्को येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शरण आलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

शांतीनगर - वास्को येथे रहिवासी चाळोबा केसरकर याने आपली पत्नी वैशाली (वय ३९) हिच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून तिचा खून केला. ही घटना त्यांच्या राहत्या घरी आज दुपारी १.३० वाजता घडली. वैशालीला घरात मारहाण झाल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच, त्यांनी जवळच रहात असलेल्या तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली.

Crime News
Goa's Three Controversy: शांतादुर्गा, कोकण रेल्वे, फार्मा नोकरभरती; आठवडा गाजवणाऱ्या गोव्यातील तीन घटना

यावेळी तिचे वडील वसंत साळस्कर यांनी घटनास्थळी धाव घेताच तेथे वैशाली रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेली त्यांना आढळली. यावेळी चाळोबा याच्या हातात लोखंडी सळई होती, अशी माहिती त्यांनी दिली.

वैशालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षांपासून पती चाळोबा तिचा छळ करत होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीचा खून केला. त्यानंतर दारात लोखंडी सळई घेऊन तो लोकांना घरात जाण्यापासून रोखत होता. यावेळी त्याने वैशालीच्या वडिलांनाही घरात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी जावयाला बळजबरीने बाजूला ढकलून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली.

वैशालीचा खून झाल्याचे उघडकीस येताच, आजूबाजूच्या लोकांनी वास्को पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक कपिल नायक, उपनिरीक्षक रोहन नागेशकर व इतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाली होती. आपल्या पत्नीचा खून करून चाळोबा घरातच बसून राहिला होता.

वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी नवेवाडे - शांतीनगर येथे खून झालेल्या ठिकाणी जाऊन वैशाली हिचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिला, तर वैशालीचा पती चाळोबा केसरकर याला ताब्यात घेतले.

खून झालेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. चाळोबा व वैशालीला एक १७ वर्षांचा मुलगा असून यंदा तो दहावीत उत्तीर्ण झाला आहे. वास्को पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com