Vasco News : मांगोर येथे घराची कौले काढून चोरी; 2.50 लाख रुपयांचा ऐवज लंपास

Vasco News : वास्को पोलिसांना चोरीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, मांगोर येथील एका घरात चोरांनी सोन्याच्या वस्तू आणि रोख मिळून अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरीची घटना शुक्रवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार मांगूरहील वास्को येथील मारुती मंदिराजवळ चोरट्यांनी एका घराची कौले काढून घरात प्रवेश केला व घरातील कपाट फोडून ३ सोनसाखळ्या तसेच चांदीच्या वस्तू व मनगट्याचे घड्याळ आणि रोख रक्कम २० हजार मिळून अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

Vasco
Goa Apple Trees : गोव्यातही बहरणार सफरचंदाची झाडे; पहिल्या प्रयोगाला यश

यावेळी घरात कोणी नव्हते.घरातील मंडळी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. सकाळी जेव्हा ते घरी परतले तेव्हा चोरीची घटना उघडकीस आली. वास्को पोलिसांना चोरीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com