Vasco News : मुरगावातील केंद्रे सज्ज, निवडणूक कर्मचारी आज घेणार ताबा; एकूण १४७ मतदान केंद्रे

Vasco News : दक्षिण गोव्यात कुठ्ठाळी, वास्कोतील काही मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघात पाच तर वास्को विधानसभा मतदारसंघात एक संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आले आहे.
Vasco
VascoDainik Gomantak

Vasco News :

वास्कोसह मुरगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रे निवडणुकीसाठी सज्ज झाली आहेत. सोमवारी (ता.६) मतदान साहित्य घेउन निवडणूक कर्मचारी केंद्रांवर दाखल होणार आहेत. मंगळवारी (ता.७) सकाळपासून मतदानाला सुरवात होईल.

रविवारी संध्याकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार बंद झाला आहे. मात्र घरोघरी गाठीभेटी देणे तसेच सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत प्रचार शांततेत झाला आहे. दरम्यान, ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान प्रक्रिया या पूर्वीच पूर्ण झाली आहे. त्यांना मतदान केंद्रावर येण्याचा प्रश्नच उद्‌भवणार नाही.

दक्षिण गोव्यात कुठ्ठाळी, वास्कोतील काही मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघात पाच तर वास्को विधानसभा मतदारसंघात एक संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आले आहे.

Vasco
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

तसेच कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८ मतदान केंद्रे चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आली आहे. कारण या मतदारसंघात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तू जप्त केल्यामुळे तसेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मतदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघातील काही केंद्रे चिंताजनक तसेच संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

मुरगाव तालुक्यात एकूण १४७ मतदान केंद्रे आहेत. यासाठी सुमारे ८८० कर्मचारी तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त १६५ कार्यालयीन कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी लागणारे मतपेट्या आणि इतर साहित्याचे वाटप संबंधित मामलेदार कार्यालयात सोमवारी करण्यात येईल.

मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्‍यक सोयी-सुविधा उभारण्यात आल्या आहे. मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याचा अभ्यास करून त्यानुसार निवडणूक कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील २०० ते २५० मीटर या अंतरावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहे. या ठिकाणी जमाव होऊ नये किंवा जमावाने कुणी येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com