Vasco News : रोमटामेळातील पुरुषी वर्चस्वाला महिला पथकाकडून शह; बक्षिसांची लयलूट

Vasco News : ‘फिटनेस फर्स्ट’ महिला रोमटामेळ पथकाची कौतुकास्पद कामगिरी
Vasco
VascoDainik Gomantak

Vasco News :

वास्को, शिगमोत्सवातील रोमटामेळात आजवर पुरुष कलाकारांचे वर्चस्व राहिले आहे, परंतु येथील फिटनेस फर्स्ट महिला रोमटामेळ पथकाने याला छेद देत गोव्यातील महिलाही यात मागे नाही हे दाखवून दिले आहे.

या पथकाने आपल्या शिस्तबध्द कामगिरीने पुरुष रोमटामेळ पथकांसमोर आव्हान उभे केले आहे. राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या शिमगोत्सव शोभायात्रांत या पथकाने अनेक बक्षिसे पटकावली आहेत.

वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी, साकवाळ या भागातील महिलांनी एकत्र येऊन साल २०२२ मध्य पथक प्रमुख राखी सचिन मेस्ता, सुजाता डायस, संगीता राऊळ, उज्ज्वला पालयेकर, फरयाना उमेन आदींच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तयार केले. तसेच मुलींनाही यात सहभागी करून घेतले.

Vasco
Goa's Daily News Wrap: गोव्यातील क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

लहान मुली व महिला मिळून १२५ पेक्षा जास्त कलाकारांचा या पथकात सहभाग आहे. या पथकाला लेझीम, ढोल-ताशा आदीचे प्रशिक्षण फोंडा येथील राहुल लोटलीकर यांनी दिले. लोटलीकर यांच्याच मार्गदर्शनाखाली हे पथक शिमगोत्सव शोभायात्रांत सहभागी होत आहे.

तीन आठवडे तालमी

२०२२ मध्ये वास्को येथील शोभायात्रेत सहभागी होत आपल्या शिस्तबध्द सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर अनेक शोभायात्रांत सहभागी होत बक्षिसे पटकावली. शिमगोत्सव सुरू होण्याआधी तीन आठवड्यापूर्वी या पथकाच्या तालमीला वास्को येथील एमपीटी सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत सुरूवात होते.

या तीन आठवड्यात हे पथक प्रचंड मेहनत घेते व आपली कला सर्वांसमोर ठेवते. आज या पथकाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com