Vasco: मोठी दुर्घटना टळली, खारीवाडा जेटीचा भाग कोसळला; कामगार थोडक्यात वाचला

Vasco Jetty Collapse: वास्को खारीवाडा समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार जेटीचा काहीसा भाग आज कोसळला. जेटीचा भाग कोसळला तेव्हा एक कामगार तेथे उपस्थित होता.
Vasco Jetty Collapse
Vasco Jetty CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्को खारीवाडा समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार जेटीचा काहीसा भाग आज अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या जेटीचा भाग कोसळत असताना एक कामगार तेथे उपस्थित होता. मात्र, कोसळण्याचा अंदाज आल्याने त्याने वेळेवर उडी मारून जीव वाचवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

गेल्या अनेक वर्षांपासून या जेटीच्या नूतनीकरणाची मागणी केली जात आहे. परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने जेटीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. लाकूड व सिमेंटचा मोठा भाग झिजल्यामुळे जेटीचे पाया कमकुवत झाले असून, संपूर्ण जेटी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Vasco Jetty Collapse
Goa Water Metro: गोव्यातील 'वॉटर मेट्रो'ला मिळणार केंद्राचे सहकार्य, 25 ऑक्टोबरपूर्वी सर्वेक्षण

या घटनेनंतर माजी महसूल मंत्री व अखिल गोवा मच्छीमार मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com