Dabolim Flyover : ‘दाबोळी’वरील फ्लायओव्हरची गडकरींच्या हस्ते पायाभरणी

Dabolim Airport : दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सेपरेटर ते क्विनीनगरपर्यंतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या ६५० कोटींच्या फ्लायओव्हरच्या कामाची गडकरींनी आभासी पद्धतीने पणजीतून पायाभरणी केली.
Nitin Gadkari In Goa
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को, केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता.११) मोपा लिंक रोडचे लोकार्पण केले.

तसेच वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी नुकतीच नवी-दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन त्यांना दाबोळी विमानतळावरील ग्रेड सेपरेटर ते क्विनीनगरपर्यंतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या ६५० कोटींच्या उड्डाणपुलाच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले होते व ते आमंत्रण गडकरी यांनी स्वीकारल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.१२) दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सेपरेटर ते क्विनीनगरपर्यंतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या ६५० कोटींच्या फ्लायओव्हरच्या कामाची गडकरींनी आभासी पद्धतीने पणजीतून पायाभरणी केली.

दरम्यान, या दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलामुळे येथील दाबोळी जंक्शन, वालेस जंक्शन, एमईएस कॉलेज जंक्शन तसेच उपासनगर आदी भागातील वाहतुकीचा होणारा खोळंबा दूर होणार आहे. रस्त्याच्या सुरक्षेचा यामुळे गंभीर प्रश्न सुटणार आहे.

Nitin Gadkari In Goa
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

कारण या दोन किलोमीटरच्या अंतरात वाहनांच्या अतिवेगमर्यादेमुळे आतापर्यंत अनेक अपघात घडून अनेकांना आपले जीव गमवावे लागले. येथे लोक साहित्य घेण्यासाठी ये-जा करतात व रस्ता ओलांडताना धोका पत्करतात.

या उड्डाणपुलामुळे ही समस्या दूर होणार आहे; कारण वेर्णा, पणजी, मडगाव व इतर ठिकाणी जाणारी वाहने या उड्डाणपुलावरून जाणार असल्याने या रस्त्यावर वाहतूक सुरक्षित होईल व लोकांना दिलासा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com