Bicholim News: डिचोली येथे उद्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्‍यानिमित्त विविध कार्यक्रम

Bicholim News: सोहळ्‍यानिमित्त शिवराज्याभिषेक, शिवकालीन वेशभूषा असे कार्यक्रम होणार.
Various programs on the occasion of Shiv Rajyabhishek Day tomorrow at Bicholim
Various programs on the occasion of Shiv Rajyabhishek Day tomorrow at BicholimDainik Gomantak

Bicholim News: छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोलीनगरीत येत्या गुरुवारी (ता. २०) तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी वेगवेगळ्या संघटनांतर्फे होणाऱ्या या सोहळ्‍यात शिवराज्याभिषेक, शिवकालीन वेशभूषा आदी कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रसाद नाईक, गोविंद चोडणकर, पापुराज मयेकर आणि उदय जांभेकर यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शिवप्रेमींनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

दरम्‍यान, या सोहळ्‍यानिमित्त शिवकालीन वेशभूषा स्‍पर्धा आयोजित करण्यात आली असून, ती ५ ते ७ आणि ८ ते १२ वर्षे अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.

Various programs on the occasion of Shiv Rajyabhishek Day tomorrow at Bicholim
Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांमुळे मंदिरांचे रक्षण

मंगेश पाटील यांचे व्‍याख्‍यान

सकाळी ८.३० वाजता शिवप्रेमींतर्फे जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्‍याला जल आणि दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता पं. दीनदयाळ सभागृहात शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मंगेश पाटील उपस्थित असतील. त्यांचे व्याख्यान होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com